Latest

Rahul Narwekar : आमदार अपात्रता प्रकरणावर राहुल नार्वेकरांचे महत्त्वाचे विधान

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन : आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "मी कायदा आणि घटनात्मक तरतुदींच्या आधारे निर्णय घेईन. Rahul Narwekar

दरम्यान, एखादा निर्णय नियमबाह्य असेल, घटनाबाह्य असेल तर सर्वोच्च न्यायालय या निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकते. मात्र, तसे काही नसेल, तर सर्वोच्च न्यायालय इतर संस्थांच्या कामकाजात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही. सभागृहाबाहेर केलेल्या आरोपांकडे लक्ष देत नाही. आरोप करणारे लोक हे केवळ निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी आरोप करीत आहेत. या आरोपांमुळे माझ्या निर्णय प्रक्रियेवर कोणताही फरक पडत नाही, असे नार्वेकर यांनी म्हटले होते.  Rahul Narwekar

आमदार अपात्रता प्रकरणी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नव्या वेळापत्रकावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रता याचिकांवर ३१ डिसेंबरपर्यंत तर राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेवर ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सोमवारी (दि. ३०) दिले आहेत. आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकरांना न्यायालयाने दुसऱ्यांदा फटकारले आहे.

याआधीही महाराष्ट्रातील आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारले होते. आमदार अपात्रतेच्या सुनावणीचे विधानसभाध्यांचे वेळापत्रक सर्वोच्च न्यायालयाने अमान्य ठरविताना सुधारीत वेळापत्रक देण्यासाठी ३० ऑक्टोबर ही अंतिम मुदत दिली होती. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने विधानसभाध्यक्षांना प्रसारमाध्यमांशी कमी बोला आणि काम करा असेही फटकारले होते. आता नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणावर महत्त्वाचे विधान केले आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT