Latest

JPNadda Vs Rahul: राहुल गांधी देशविरोधी ‘टूलकिट’; जे.पी.नड्डा यांचा काँग्रेसवर निशाणा

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: काँग्रेस नेते राहुल गांधींच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांनी राण उठवले आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिल्या आठवडा त्यामुळे गदारोळातच गेला. काँग्रेस देशविरोधी कारवायांमध्ये गुंतला आहे. राहुल गांधी 'टूलकिट'चा स्थायी भाग बनले असल्याचे म्हणत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आता राहुल यांच्यासह काँग्रेसवरच (JPNadda Vs Rahul) निशाणा साधला आहे. भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. जी-२० ची बैठक भारतात आहे, अशात राहुल गांधी विदेशी धरतीवर देश आणि संसदेचा अपमान करीत आहे, असे देखील नड्डा यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना नड्डा म्हणाले(JPNadda Vs Rahul), राहुल यांनी देशातील १३० कोटी जनतेने निवडलेल्या सरकारचा अपमान केला आहे. हे गद्दारांना बळकट करण्यासारखे नाही का? असा सवाल नड्डा यांनी उपस्थित केला. भारतात लोकशाही संपुष्टात आली आहे, यूरोप-अमेरिकेने यात हस्तक्षेप केला पाहिजे, असे ते विदेशी धरतीवर सांगतात. यापेक्षा सर्वाधिक शरमेची बाब कुठलीच नाही. इतर देशांना भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी राहुल गांधी करीत असतील, तर त्यांची भावना काय आहे? असा सवाल नड्डा यांनी उपस्थित केला आहे.

राहुल गांधी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्यांच्या इतिहासात, मोठ्यात मोठ्या संकटात कुठल्याही भारतीय नेत्याने विदेशी शक्तींना भारत सरकार विरोधात कारवाईची मागणी (JPNadda Vs Rahul) केली नव्हती. पंरतु, ही स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वात गंभीर बाब आहे. जॉर्ज सोरोस, राहुल गांधींची भाषा एकसारखी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तान-काँग्रेसची भाषा एकसारखीच का? असा सवाल देखील नड्डा यांनी केला आहे.

इटली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान असल्याचे म्हणतात. जागतिक बँक आयएमएफ पासून सर्व भारताच्या विकासाची स्तुती करतात. जर्मनचे चान्सलर यांनी भारताच्या विकासाला अतुलनीय म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया, यूएई तसेच सउदी अरब देखील पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करतात. पंरतु राहुल गांधी देशाचा अपमान करतात. भारत लोकशीची जनक आहे. जगात अशी कुठलीही शक्ती नाही, जी भारताच्या लोकशाही पंरपरेला नुकसान पोहचवू शकते. राहुल यांचे पक्षात कुणी ऐकत नाही, जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही, त्यामुळेच त्यांचा पक्ष रसातळाला जात असल्याचेही जे.पी. नड्डा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT