Budget session of Parliament: राहुल गांधींच्या संसदेतील ‘उपस्थिती’ वर भाजपचे बोट | पुढारी

Budget session of Parliament: राहुल गांधींच्या संसदेतील 'उपस्थिती' वर भाजपचे बोट

पुढारी ऑनलाईन : केंब्रिज विद्यापीठातील व्याख्याना दरम्यान केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. संसदीय अधिवेशना दरम्यान राहुल गांधी यांनी संसदेत बोलू दिले जात नसल्याची तक्रार केली. यानंतर राहुल गांधी यांच्या संसदीय कामकाजातील (Budget session of Parliament) उपस्थितीवर बोट ठेवत, त्यांची लोकसभेतील खासदांच्या सरासरी एवढीही उपस्थिती नाही, अशी  टीका भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget session of Parliament) दुसऱ्या सत्रात सत्ताधारी पक्षाने राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून चांगलेच घेरलेले दिसले. दरम्यान, भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे की, “राहुल गांधी हे परदेशात जाऊन देशाचा अपमान करत आहेत. ते देशाविरुद्ध मोहीम चालवत आहेत. त्यांनी देशाची माफी मागावी. केंब्रिजचे रडगाणे आता थांबवावे.”

विशिष्ट कलेच्या माध्यमातून भ्रष्टाचार करणे आणि भ्रष्टाचाराची कला ही फक्त काँग्रेसलाच माहीत आहे. दहशतवाद संघटनेला फंड पुरविणाऱ्या प्रकरणांचा आणि काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्य मॉडेलवर तपास यंत्रणाना  केस स्टडी करत आहेत, असा टोलाही अनुराग ठाकूर यांनी लगावला.

Budget session of Parliament : अधिवेशनादरम्यान राहुल गांधींना सत्ताधाऱ्यांनी घेरले

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचा पहिला दिवस गदारोळाने गाजला. राहुल गांधी यांनी ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पीयूष गोयल आणि केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक खासदारांनी राहुल गांधींनी सभागृहात येऊन माफी मागावी, अशी अशी मागणी केली. यामुळे सोमवारी (दि.१३) सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले होते.

हेही वाचा:

Back to top button