Latest

Radio Station : 284 शहरांतील 808 रेडिओ केंद्रांचा लवकरच ई-लिलाव; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

backup backup
पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली दि 23, : Radio Station : रेडिओ क्षेत्राच्या विस्तारासाठी 284 शहरांतील 808 रेडिओ केंद्रांचा लवकरच ई-लिलाव केला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. त्यांनी ही माहिती रविवारी रिजनल कम्युनिटी रेडिओ संमेलनात बोलताना दिली. रेडिओ क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार होण्यास यामुळे मदत मिळेल, असा विश्वासही ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला.
रेडिओ केंद्रे चालविण्यासाठीच्या परवाना प्रक्रियेत सुलभता आणली गेली आहे, असे सांगून ठाकूर पुढे म्हणाले की, कम्युनिटी रेडिओ जास्त प्रमाणात सुरु व्हाव्यात, यावर सरकारचा भर आहे. सध्या देशातील 26 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशांतील 113 शहरांमध्ये 388 एफएम रेडिओ केंद्रे सुरु आहेत. आता तिसऱ्या टप्प्यात 284 शहरांमधील 808 रेडिओ केंद्रांसाठी ई लिलाव केला जाणार आहे.
हे ही वाचा :
SCROLL FOR NEXT