Latest

Qatar vs Ecuador : फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात घडला अनोखा विक्रम

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज (दि. २०) फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली. स्पर्धेतील पहिला सामना यजमान कतार आणि इक्वाडोर या संघात खेळवण्यात आला. (Qatar vs Ecuador) या सामन्याला भारतीय वेळेनुसार ९.३० वाजता सुरूवात झाली. सामन्याच्या आधी अल बायत स्टेडियमवर स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभासाठी जगभरातील अनेक कलाकरांनी सादरीकरण केले.

सामन्याच्या सुरूवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळी केली. याचा फायदा इक्वाडोर संघाला झाला. सामन्याचा तिसऱ्या मिनिटाला इक्वाडोरचा कर्णधार इन्नर व्हॅलेन्सियाने गोल करत संघाचे खाते उघडले. परंतु सामन्याच्या रेफरी यांनी गोलची पडताळणी केली असता. त्यांना कर्णधार व्हॅलेन्सियाने ऑफ साईडमधून गोल केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी हा गोल अवैध घोषित केला. १६ व्या मिनिटाला इक्वाडोच्या खेळाडूला कतारच्या बचावपटूने डेंजरझोनमध्ये अवैधरित्या अडवल्यामुळे रेफरींनी इक्वडोर संघाला पेनल्टी किक बहाल केली. या सुवर्णसंधीचा फायदा घेत संघाचा कर्णधार इन्नर व्हॅलेन्सियाने कोणतीही चूक करता गोल करत संघाला सामन्यात १-० अशी आघाडी मिळवून दिली. (Qatar vs Ecuador)

३१ व्या मिनिटाला कर्णधार इन्नर व्हॅलेन्सियाने हेडरने संघासाठी आणि वैयत्तिक दुसरा गोल नोंदवून संघाला सुरक्षित आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या ४५ व्या मिनिटाला कतारने गोल करण्याची चांगली संधी निर्माण केली होती. परंतु संघाचा खेळाडू अली याने चेंडू हेडने गोल पोस्टच्या बाहेर मारून सामन्यातील आघाडी कमी करण्याची संधी हुकवली.

दुसऱ्या हाफची सुरूवातदेखील आक्रमक पध्दतीने केली. यावेळी कतारचा संघ आघाडी कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसत होता.परंतु इक्वाडोर संघातील बचावपटूंची भिंत कतारच्या खेळाडूंना अखेर पर्यंत भेदता आली नाही. तर,इक्वाडोरचा संघ आघाडी अधिक भक्कम करण्यासाठी चाली रचून गोल करण्याचा प्रयत्न करत होता. संपूर्ण सामन्यामध्य़े इक्वाडोर संघाने बाॅलचा ताबा अधिक काळ आपल्याकडे ठेवला होता. दुसऱ्या हाफमध्ये इक्वाडोरचा संघ शॉर्ट पासिंग करत गोल करण्यासाठी चढाई करत होते.

सामन्यात अनेक प्रयत्न करूनही कतारला गोल नोंदवता आला नाही. तर इक्वाडोरचा कर्णधार इन्नर व्हॅलेन्सियाने केलेल्या दोनच्या आघाडी कायम ठेवत इक्वाडोरने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात यजमान कतारचा २-० अशा फरकाने पराभव करत स्पर्धेत विजयाचे खाते उघडले.

स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात घडला अनोखा विक्रम

फुटबॉल विश्वचषक २०२२ च्या सलामीच्या सामन्यात इक्वेडोरने यजमान कतारचा २-० अशा गोल फरकाने पराभव केला. इक्वेडोरच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका कर्णधार एनर व्हॅलेन्सिया याची होती.त्याने संघासाठी दोन गोल करून चांगली आघाडी मिळवून दिली. हे दोन्ही गोल त्याने सामन्यच्या पहिल्या हाफमध्ये नोंदवले. या गोलमुळे यजमान कतारचा पराभव झाला. फिाफा विश्वचषक स्पर्धेच्या ९२ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच यजमान संघ सलामीच्या सामन्यात पराभूत झाला आहे.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT