Latest

PV Sindhu : इंडोनेशिया ओपनमध्ये सिंधूचे आव्हान संपुष्टात

Shambhuraj Pachindre

जाकार्ता; वृत्तसंस्था : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिचे इंडोनेशिया ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. प्री-क्वार्टर फायनलमध्ये तैवानच्या ताई जू यिंगने सरळ सेटमध्ये तिचा 21-18, 21-16 असा सरळ गेमममध्ये पराभव केला. सिंधूने पहिल्या गेममध्ये उशिरा पुनरागमन केले, पण शेवटी 21-18 असा गेम गमावला तर दुसर्‍या गेममध्ये सुरुवातीला आघाडी घेतल्यानंतरही तिने गेमसह सामनाही गमावला. या दोघींमध्ये हा एकूण 24 वा सामना होता. यापैकी 19 वेळा ताई जू यिंग विजेती ठरली आहे. तर फक्त पाच वेळा सिंधूला विजेतेपद मिळाले आहे. यात वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचाही समावेश आहे. (PV Sindhu)

या सामन्यात सुरुवातीला सिंधू लयीत दिसली नाही आणि ताईने 4-0 अशी आघाडी घेतली. यानंतर सिंधूने काही चांगले फटके खेळून पुनरागमनाचा प्रयत्न केला; परंतु ताईच्या धडाकेबाज ड्रॉप आणि स्मॅशपुढे तिचा टिकाव लागला नाही. पहिला गेम गमावल्यानंतर सिंधूने दुसर्‍या गेममध्ये चांगला प्रतिकार केला. एकेक पाईंटसाठी दोघींमध्ये चांगलीच झुंज रंगत होती. सिंधूने 16-14 अशी बरोबरीही केली होती; परंतु येथून सिंधूने पकड गमावली आणि गेमसह सामना गमावला. (PV Sindhu)

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT