पुढारी ऑनलाइन डेस्क : Putine Vs Prigozhin : रशियात व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात बंड करून रशियाला नवीन राष्ट्राध्यक्ष देण्याची घोषणा करणाऱ्या प्रिगोझिनने अवघ्या 12 तासात माघार घेतली आहे. प्रिगोझिनने वॅगनरच्या (Wagner group) सैनिकांना मागे फिरण्याचे आदेश दिले आहेत. तसेच खून खराबा होईल म्हणून माघार घेत असल्याचे प्रिगोझिन याने म्हटले आहे. वॅगनर समूह आणि पुतिन यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्जेंडर लुकाशेंको यांनी मध्यस्थी केल्याचे समजते.
येवगेनी प्रिगोझिन याने आपल्या अधिकारिक टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून म्हटले आहे. मोठ्या प्रमाणात खून-खराबा होऊ शकतो यासाठी एका पक्षाने जबाबदारी समजून घेऊन थांबवण्याचा निर्णय घेतला. आम्ही आपल्या सैनिकांच्या गटाला मागे घेत आहोत. योजनेअंतर्गत आम्ही आमच्या फिल्ड शिबिरांमध्ये माघारी जात आहोत. प्रिगोझिन यांच्या या स्टेटमेंट नंतर काही तासातच रोस्तोव शहरातून वॅगनरचे सैनिक त्यांच्या ट्रकमध्ये चढून शहरातून बाहेर जाताना पाहायला मिळाले. यावेळी लोकांनी वॅगनरच्या सैनिकांसोबत सेल्फी घेऊन त्यांच्या समर्थनार्थ नारे देखील लावल्याची माहिती आहे. Putine Vs Prigozhin
24 तासातील या नाट्यमय घडामोडीनंतर प्रिगोझिन यांनी अवघ्या 12 तासातच कशा प्रकारे माघार घेतली याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. हा विद्रोह संपवण्यामागे बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्जेंडर लुकाशेंको यांची प्रमुख भूमिका आहे. त्यांनी पुतिन आणि प्रिगोझिन यांच्यात समेट घडवून आणला. लुकाशेंकोने रूस आणि येवगेनी प्रिगोझिन यांच्यात मध्यस्थता घडवून आणली. त्यानंतर प्रिगोझिन यांनी वॅगनरच्या सैनिकांना मागे फिरण्याचे आदेश दिले.
बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्जेंडर लुकाशेंको यांच्या दफ्तरकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, प्रिगोझिन यांच्यासोबत बोलणी सुरू असताना पुतिन यांच्यासोबतही कॉर्डिनेशन सुरू होते. त्यानंतर डीलवर सहमती झाली. या डीलनुसार येवगेनी प्रिगोझिन मागे हटण्यास तयार झाले. ते आता बेलारूसमध्ये राहणार. क्रेमलिनचे प्रवक्ता दिमित्री पेसकोव यांच्या म्हणण्यानुसार, खाजगी रशियन लष्करी कंपनी वॅग्नरचे प्रमुख शेजारच्या बेलारूसमध्ये जातील आणि तणाव कमी करण्यासाठी त्यांच्यावरील फौजदारी खटला सोडून देण्यात येईल, अशी डील झाली आहे.
क्रेमलिनने स्पष्ट केले आहे, की बंडखोरी प्रकरणात येवगेनी प्रीगोझिनवरील आरोप मागे घेतले जातील आणि त्याच्यासह समाविष्ट सैनिकांवरही कारवाई केली जाणार नाही. येवगेनी स्वतः बेलारूसला जाईल. याव्यतिरिक्त, बंडखोरीमध्ये भाग घेतलेल्या सैनिकांवर कारवाई केली जाणार नाही. परंतु त्याऐवजी त्यांना रशियन सैन्यात सामील होण्यासाठी करारावर स्वाक्षरी करण्याची संधी दिली जाईल. पुतीन दोन दशकांहून अधिक काळ सत्तेत आहेत. हे संकट कमी करण्यासाठी सरकारने हा करार मान्य केला आहे. Putine Vs Prigozhin
हे ही वाचा :