Latest

Trump vs Putin : अमेरिकेचे तत्‍कालिन राष्‍ट्राध्‍यक्ष ट्रम्‍प यांना अडकविण्‍यासाठी रशियन अध्‍यक्षांनीच रचला होता ‘हनीट्रॅप’

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

अमेरिका जगातील महासत्ता. या देशाचा राष्‍ट्राध्‍यक्ष जगातील सर्वात शक्‍तीशाली नेता. तसेच रशियाच्‍या ताकदीचा जगभर बोलबाला. शीतयुद्‍ध काळात हे दोन्‍ही देश एकमेकांवर कुरघोडी करण्‍याची एकही संधी सोडत नसत. आता तो काळ संपला. रशियाला पिछाडीवर टाकून अमेरिका सर्वच क्षेत्रात खूपच पुढे गेली. तरीही या दोन देशांमधील सुप्‍त संघर्ष आजही कायम आहे. ( Trump vs Putin )  याला उजाळा देण्‍याचे कारण म्‍हणजे, अमेरिकेचे तत्‍कालिन राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांना अडकविण्‍यसाठी रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्‍लादिमीर पुतिन (Trump vs Putin) यांनी 'हनीट्रॅप' लावला होता, अशी धक्‍कादायक माहिती व्‍हाईट हाउसच्‍या माजी माध्‍यम सचिव स्‍टेफनी ग्रिशम यांनी आपल्‍या पुस्‍तकात दिली आहे.

सर्वच देश आपल्‍या पराराष्‍ट्र धोरण राबविताना साम-दाम-दंड-भेद या नितीचा वापर करतात. याचे खुलासे अनेक वर्षांनी होतो. हे खुलासे झाले की, याची जगभर चर्चा होते. गुप्‍तचर विभागात 'हनीट्रॅप' हा नेहमीचाच फंडा. मात्र परराष्‍ट्र धोरण राबविताना 'हनीट्रॅप'चा वापर हा भुवया उंचविणारा ठरतो. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी (Trump vs Putin) मात्र हनीट्रॅप थेट अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांसाठी लावला होता, असा आरोप स्‍टेफनी ग्रिशम यांनी आपल्‍या पुस्‍तकात केला आहे.

Trump vs Putin : नेमक काय आहे प्रकरण?

ग्रिशम यांनी 'आई विल टेक युवर क्वैश्चन्स नाऊ' या पुस्‍तकात म्‍हटलं आहे की, २०१९ मध्‍ये जपानमधील ओसाका येथे जी-२० परिषद होती. अशा परिषदांमध्‍ये देशांमधील संबंध अधिक दृढ व्‍हावे, म्‍हणून राष्‍ट्राध्‍यक्ष व्‍यक्‍तिगत भेटही घेतात. ओसाकामध्‍येही पुतिन आणि ट्रम्‍प यांची भेट निश्‍चित झाली होती. निश्‍चित वेळेनुसार राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे अमेरिकेचे तत्‍कालिन राष्‍ट्राध्‍यक्ष ट्रम्‍प यांची भेट घेण्‍यासाठी हॉटेलमध्‍ये गेले. यावेळी त्‍यांनाबरोबर त्‍यांचे सहकारी होते. यामध्‍ये एक अनोळखी चेहरा होता. एक खूप सुंदर तरुणी त्‍यांच्‍याबरोबर होती. तिचे नाव होते डेरिया बोरक्‍शया.

'त्‍या'वेळी काय घडलं?

२०१९ मध्‍ये ओसाकामध्‍येही पुतिन आणि ट्रम्‍प यांची भेट झाली होती. त्‍यावेळी नृत्‍यांगना डेरिया बोरक्‍शया हिची दुभाषक म्‍हणून असणारी उपस्‍थिती चर्चेचा विषय ठरली आहे.

ग्रिशम यांनी पुस्‍तकात नमूद केले आहे की, हॉटेलमध्‍ये पुतिन हे ट्रम्‍प यांची भेट घेण्‍यासाठी आले. त्‍यावेळी माझ्‍याजवळ ट्रम्‍प यांच्‍या सल्‍लागार फियोना हिल बसल्‍या होत्‍या. त्‍या माझ्‍या कानाजवळ कुजबुजल्‍या की, तुम्‍ही
रशियाच्‍यावतीने आलेल्‍या दुभाषक तरुणीला पाहिलं का? किती सुंदर आहे ती. लांब केस, अतिशय सुदंर चेहरा आणि जबरदस्‍त फिगर. मला असा संशय आहे की, आपल्‍या राष्‍ट्राध्‍यक्ष (डोनाल्‍ड ट्रम्‍प) यांचे लक्ष विचलित करण्‍यासाठी रशियाने तिला सोबत आणले आहे. यानंतर ट्रम्‍प आणि पुतिन यांच्‍या भेटीचा क्षण टीव्‍हीवरही झळकला. यावेळी सर्वांच्‍या नजरा डेरिया हिच्‍याचर खिळल्‍या. तिचे ग्‍लॅमरस फोटो आणि व्‍हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्‍हायरलही झाले होते, असेही ग्रिशम यांनी आपल्‍या पुस्‍तकात म्‍हटलं आहे.

Trump vs Putin : पुतिन यांनीच केली होती डेरियाची निवड

याबाबत पुतिन यांचे प्रवक्‍ता दिमित्री पेस्‍कोव यांना विचारण्‍यात आले. त्‍यांनी सांगितले की, तुम्‍हाला डेरिया ही रशियन हेर वाटत आहे का? आम्‍हाला दुभाषकाची गरज होती. त्‍यामुळे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतीन यांच्‍याबरोबर डेरिया आली. रशियावर करण्‍यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत, असा दावाही त्‍यांनी यावेळी केला होता. मात्र हा खुलाचा चुकीचा असल्‍याचे काही वेळानंतर स्‍पष्‍ट झाले. कारण पुतिन यांनीच डेरिया हिची दुभाषक म्‍हणून २०१६मध्‍ये निवड केली होती. २०१६ मध्‍ये अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा आणि पुतिन यांची एक भेट झाली होती. त्‍यावेळीही डेरिया उपस्‍थित होती. तसेच २०१८ मध्‍ये पुतिन यांनी अमेरिकेचे राष्‍ट्रीय सुरक्षा संस्‍थेचे जॉन बोल्‍टन यांची भेट घेतली होती त्‍याही वेळी डेरियाची उपस्‍थिती चर्चेचा विषय ठरली होती.

डेरिया उत्‍कृष्‍ट नृत्यांगना

'न्‍यूयॉर्क पोस्‍ट'च्‍या माहितीनुसार, पुतीन यांच्‍या टीममधील डेरिया बोरक्‍शया ही एक उत्‍कृष्‍ट साल्‍सा नृत्‍यांगना आहे. तिने अनेक व्‍हिडिओ सोशल मीडियावर आहेत. तिने सेंट पीटर्सबर्ग विद्‍यापीठात भाषांतराची डिग्री मिळवली होती. त्‍यामुळे ग्रेशिम यांनी केलेल्‍या आरोपला पुष्‍टी मिळते, असा दावा अमेरिकेच्‍या माध्‍यमांमधून होत आहे.  एकुणच ट्रम्‍प यांना ट्रप करण्‍यासाठी रशियाच्‍या रणनीतीवर आता चर्चा रंगली आहे. रशियाने आपल्‍या परराष्‍ट्र धाेरणासाठी हनीट्रॅपचा केलेला वापर हा अमेरिकेतील माध्‍यमात चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचलं का?

SCROLL FOR NEXT