Latest

कोरियन ‘पुष्‍पा’चा श्रीवल्लीवर शेम टू शेम डान्स; लोकं म्‍हणाली हे तर कोरियन व्हर्जन!

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क 

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' हा चित्रपटाने चांगलीच हवा केली आहे. जगभर हा चित्रपट गाजत आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. पण तरीही, अल्लूचे धमाकेदार संवाद, आकर्षक गाणी आणि सोशल मीडियावरील त्याचे स्टेप्स इंटरनेटवर धडाक्‍यात चालत आहेत. इंस्टाग्राम रीलचे जग पुष्पाच्या 'सर्वल्ली' स्टेप्सने भरले आहे. खरे तर या गाण्याची क्रेझ एवढी आहे की, केवळ भारतीयच नाही तर परदेशी अबाल वृद्धही त्याच्या तालावर नाचू लागले आहेत! आता एका कोरियन महिलेची पुष्पातील श्रीवल्‍ली गाण्यातील स्‍टेप्स इंस्टाग्रामवर व्हायरल झाली आहे. तुम्ही अजून पाहिले नसेल तर जरूर पहा.

या व्हायरल क्लिपमध्ये एक कोरियन महिला 'श्रीवल्ली' गाण्याच्या स्टेप्स करताना दिसत आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्या महिलेने अल्लू अर्जुनच्या स्टेपचीच नव्हे तर त्याची पुष्पा शैली देखील कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी या महिलेने पुष्पा टाईपचा शर्ट, चष्माही परिधान केला असून, 'श्रीवल्ली' गाण्याच्या लोकप्रिय हुक स्टेप्ससह फुलांचा स्वॅग केला आहे, ज्याला पाहून सोशल मीडियावरील लोक या महिलेचे चाहते झाले आहेत.

इन्स्टाग्राम हँडल Korea.g1 वरून ही मस्त क्लिप शेअर करण्यात आली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. 'हे नृत्य तुम्हाला वाटते तितके सोपे नाही. अल्लू अर्जुनची कोरियन आवृत्ती. बरं ही क्लिप पाहिल्यानंतर तुम्हाला काय म्हणायचे आहे? या क्लिपला 2 लाखाहून अधिक लाईक्स आणि लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT