Latest

Punjabi women in Muscat: पंजाबी महिलांची मस्कत देशात विक्री

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमधील अनेक महिलांची मस्कत देशात विक्री करून त्यांच्याकडून अनैतिक कामे करवून घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. पंजाबमधून विक्री करण्यात आलेल्या अशा अनेक महिला आहेत. या महिलांनी भारतात परतण्याची आशा गमावली आहे.

दरम्यान, आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संत बलबीर सिंग यांच्या प्रयत्नामुळे एका महिलेची सुटका करण्यात यश आले आहे.  पंजाबमधील कपूरथला येथील पीडित महिलेला मागील २ महिन्यांपासून मस्कतमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. (Punjabi women in Muscat)

रविवारी पीडिता तिच्या घरी पोहोचली आहे. पीडित महिलेने पंजाबमध्ये परतल्यानंतर तिच्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. पंजाबमधील अनेक महिलांना मस्कतमध्ये विकून घृणास्पद काम करवून घेतले जात असल्याचे त्या महिलेचे सांगितले. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी ती या वर्षी मार्चमध्ये मस्कतला घरगुती कामासाठी गेली होती. यासाठी तिने एका एजंटकडून ७० हजार रुपये घेतले होते. (Punjabi women in Muscat)

दरम्यान, मस्कतला पोहोचताच तिला एका हॉस्पिटलमध्ये साफसफाईचे काम करण्याच्या नावाखाली अवैध काम करण्यास सांगण्यात आले. दरम्यान, एजंटने पीडित महिलेकडून पासपोर्ट आणि मोबाईल फोनही काढून घेतला होता. (Punjabi women in Muscat)

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT