Latest

Punjab election result : पंजाबमध्‍ये आप सुसाट, सत्ता स्‍थापनेकडे आगेकूच

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्‍पष्‍ट होत आहेत. अपेक्षेप्रमाणे आम आदमी पार्टीने ५४ जागांवर मुसंडी मारत काँग्रेस धक्‍का दिला आहे. आम आदमी पार्टी ८९, काँग्रेस १५, अकाली दल आणि आघाडी ८, रालोआ ४ जागांवर आघाडीवर आहेत. आप आदमी पार्टीने घवघवीत यश मिळत असल्‍याचे चित्र आहे. २०१७ विधानसभा निवडणुकीपेक्षा तब्‍बल ६९ जागावर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला ६२ जागांवर फटका बसला आहे. अकाली दलासही १५ जागा गमवाव्‍या लागतील, असे स्‍पष्‍ट होत आहे. (Punjab election result)

पंजाबचे 'आप'ची बल्ले बल्ले

२०१७ मध्‍ये आम आदमी पार्टी विजय होईल अशी हवा होती.काँग्रेसने ७७ जागांवर विजय मिळवला होता. आम आदमी पार्टीने २० जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र यंदाच्‍या निवडणुकीत पंजाबमध्‍ये आम आदमी पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे. तब्‍बल ४६ जागांवर आघाडी घेतली आहे. ही आघाडी कायम राहिल्‍यास पंजाबमध्‍ये सत्तांतर होणार आहे. प्रारंभी आप आणि काँग्रेसमध्‍ये काँटे की टक्‍कर होईल, असा अंदाज होता. मात्र एका तासामध्‍ये निकालाचे चित्र बदलले. ४८ जागांवर आपने आघाडी घेतली आहे.

दिग्‍गज नेत्‍यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. मुख्‍यमंत्री चरणजीत चन्‍नी हे दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. भदौड आणि चमकौर साहिब या देन्‍ही मतदारसंघात ते आघाडीवर आहेत. अमृतसर पूर्वमधून नवज्‍योत सिंग सिद्धू, मोहालीमध्‍ये बलबीर सिंग सिद्धू, जालालाबदमध्‍ये सुखबीर बादल आघाडीवर आहेत.

एक्झिट पोलमध्‍येही आपला मिळाला होता कौल

एक्झिट पोलच्या सर्वेक्षणानुसार आम आदमी पार्टी (आप) पंजाबमध्ये विधानसभेच्या ११७ जागांवर बहुमत मिळवू शकते. त्यांना जवळपास ७० जागा मिळू शकतात. सध्या सत्ताधारी काँग्रेसला केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागू शकते. भाजपची सर्वात वाईट कामगिरी पंजाबमध्येच होण्याची शक्यता आहे. भाजप कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेससोबत युती करून निवडणूक लढवत आहे, तर अकाली दल आणि बसपा यांची युती आहे.

राज्यातील ६६ ठिकाणी उभारण्यात आलेल्या ११७ मतमोजणी केंद्रांवर सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी केंद्रांवर केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या ४५ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचलं का ?

SCROLL FOR NEXT