Latest

पुणे : सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून वसुली अधिकाऱ्याचाच सोन्यावर डल्ला; लॉकरमधील ११४ तोळे दागिन्यांची चोरी

backup backup

आळेफाटा; पुढारी वृत्तसेवा : बेल्हे (ता. जुन्नर) येथील वैष्णवी मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या लॉकरमध्ये नागरिकांनी तारण ठेवलेल्या ५१ लाख २१ हजार रुपये किमतीच्या ११४ तोळे सोन्यावर सोसायटीच्याच वसुली अधिकाऱ्याने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विकास शांताराम खिलारी (वय ४१) असे कर्मचाऱ्याचे नाव असून आळेफाटा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहे. सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून सोने गायब केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बेल्हे येथील वैष्णवी मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे वसुली अधिकारी व क्लार्कचे काम करणारे कर्मचारी विकास शांताराम खिल्लारी (रा. बेल्हे) यांनी सीसीटीव्ही डीव्हीआर बंद करून चोरी केली. अक्षय वसंत जगताप यांनी सोसायटीच्या लॉकरमध्ये तारण ठेवलेले २७ तोळे ७८० मिली ग्रॅम, महेंद्र बबन जगताप यांचे ५ तोळे ४४८ मिली ग्रॅम, हारून बाबुभाई बेपारी यांचे ५ तोळे ९९८ मिली ग्रॅम, राहुल वसंत जगताप यांचे ४ तोळे ५०० मिली ग्रॅम, जाफर अहमद पठाण यांचे ११ तोळे २४० मिली ग्रॅम, हारून बाबू भाई बेपारी यांचे १५ तोळे ५९९ मिली ग्रॅम, सद्दाम रफिक बेपारी यांचे ८ तोळे ८१५ मिली ग्रॅम, सुनंदा नामदेव नलावडे यांचे १४ तोळे ३४ मिली व ११ तोळे १०४ ग्रॅम वजनाचे सोने दागिने असे एकूण ५१ लाख २१ हजार रुपये किमतीच्या ११४ तोळे सोन्याची चोरी केली.

शाखा व्यवस्थापक विनोद दत्तात्रेय महाडिक यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वसुली अधिकारी विकास खिलारी याच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. आळेफाटा पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर तपास करत असून वसुली अधिकाऱ्याकडे लॉकरच्या चाव्या आल्या कश्या, त्याला अजून कोणी साथीदार आहे याचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT