पुणे : छत्रपती संभाजी महाराजांना बलिदानदिनी लाखोंचे अभिवादन | पुढारी

पुणे : छत्रपती संभाजी महाराजांना बलिदानदिनी लाखोंचे अभिवादन

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या 333 व्या बलिदानदिनी वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील त्यांच्या समाधीस्थळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लाखो शंभूभक्तांनी त्यांना अभिवादन केले. देशाच्या कानाकोपऱ्यातून शक्ती- ज्योतींचे आगमन झाले. वढू ग्रामस्थांकडून आयोजित नित्यअखंड हरिनाम सप्ताह कीर्तन, शंभूवंदना आयोजनात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. समाधीस्थळावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. शासकीय मानवंदना देण्यात आली.

पीएम मोदींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; २० स्लीपर सेल, २० किलो RDX तयार असल्याचा दावा

सकाळी शासकीय पूजा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, शिरूर उपविभागीय अधिकारी संतोष कुमार देशमुख, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, शिरूर तहसीलदार रंजना उंबरहांडे, नायब तहसीलदार गिरीगोसावी, शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, गटविकास अधिकारी विजय सिंह, मंडलाधिकारी फुके, ग्रामसेवक शंकर भाकरे, तलाठी शिरसाठ, पोलिस पाटील जयसिंग भंडारे यांच्या हस्ते करण्यात आली. तुळापूर (ता. हवेली) येथील समाधीस्थळी समाधी पूजन, श्री संगमेश्वर अभिषेक, मूकपदयात्रा, रक्तदान शिबिर, साखळदंडाचे पूजन, धर्मसभा, पोवाडा सादरीकरण करण्यात आले. वढू आणि तुळापूर या दोन्ही ठिकाणी शंभूभक्तांचा ओघ दिवसभर चालू होता.

कोल्हापूर : बायकोला अमानुष मारहाण करून भररस्त्यावर विवस्त्र करण्याचा प्रयत्न

वढू बुद्रुक, तुळापूर ग्रामपंचायत, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे स्मृती समिती यांच्या वतीने नियोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अशोक पवार, जि. प. सदस्य सविता बगाटे, नियोजन समितीचे पंडित आप्पा दरेकर, मोठ्या संख्येने पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

MHADA : म्हाडा वर्षभरात बांधणार १५ हजार ७८१ सदनिका

छत्रपती संभाजी महाराज जन्मस्थळ पुरंदर किल्ला ते तुळापूर, वढू बुद्रुक पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वाघोलीपासून विविध सरदार घराण्यांचे २० स्वराज्य ध्वज या सोहळ्यामध्ये समाविष्ट झाले होते. पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष संदीपआप्पा भोंडवे व इतर पदाधिकारी यांनी या पालखी सोहळ्याचे आयोजन केले.

Back to top button