Latest

सौर मिशनसाठी आयुकाने केली दुर्बीण विकसित

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: सोलर मिशन अभियानाअंतर्गत पुण्यातील आयुकाने (अंतर विद्यापीठीय एस्ट्रॉनॉमी वअस्त्रो फिजिक्स) सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 'अल्ट्रा क्लीन रूम' विकसित केली आहे. दहा वर्षाच्या अथक प्रयत्नांनंतर पुण्यातील शास्त्रज्ञांना यश आले आहे. पुण्यातील आयुका (अंतर विद्यापीठीय एस्ट्रॉनॉमी व अस्त्रो फिजिक्स) मधील दोनशे शास्त्रज्ञांना हे अनोखे संशोधन करण्यात यश आले आहे. याबाबतचा प्रस्ताव २०१२ मध्ये सरकारला सादर करण्यात आला होता. तेंव्हा पासून शास्त्रज्ञ 'सोलर अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप' विकसित करण्याच्या कामावर प्रयत्न करत होते.

आदित्य एल वन तंत्रज्ञान….

अवकाश तंत्रज्ञानातील अभ्यासासाठी 'आदित्य एल वन' हे फर्स्ट बेस मिशन अभ्यासासाठी खुले करण्यात आले आहे. यात सूर्यमालेचा अभ्यास करण्यात येणार आहे. ही दुर्बीण ए.एन.रामप्रकाश व दुर्गेश त्रिपाठी या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आली असून इस्रोचा मोठा सहभाग आहे. या दुर्बिणीमधून आदित्य एल वन या उपग्रहाद्वारे सूर्याची शेकडो छायाचित्रे घेता येतील. यापूर्वी अशी दुर्बीण भारतात विकसित झालेले नव्हती. या अभियानात शास्त्रज्ञांना अनेक प्रकारचे अडथळे आले होते. अल्ट्राव्हायोलेट करणे यासह अवकाशातील अनेक किरणांचा अडथळा येत होता, त्यावर शास्त्रज्ञांनी मात करीत हे यश मिळविले. शास्त्रज्ञ टीमने विशेष प्रकारचे फिल्टर दुर्बिणीला लावले असून त्याद्वारे सूर्याची सुंदर छायाचित्रे टिपता येणार आहे. सूर्यावरील क्षणाक्षणांचा बदल टिपणे या दुर्बिणीने शक्य झाले आहे. गेल्या पाच वर्षात इस्रोने या अभियानासाठी २५ कोटी रुपये खर्च केला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT