Latest

Pulwama Attack : पुलवामा हल्ल्यातील शहिदांना पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याला आज तीन वर्ष पूर्ण झाले. 14 फेब्रुवारी 2019 रोजी, जैश-ए-मोहम्मद (JeM) च्या दहशतवाद्याने स्फोटकांनी जवानांच्या एका बसवर हल्ला केला होता. यामध्ये 40 CRPF जवान शहीद झाले. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या तिसऱ्या वर्षपूर्तीनंतर भारतीय लष्कर आणि इतर सुरक्षा दलांनी केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) च्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून भारत मातेच्या शूर पुत्रांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, 'पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या देशासाठी त्यांनी केलेल्या अतुलनीय सेवेची आठवण ठेवा. त्यांचे शौर्य आणि सर्वोच्च बलिदान प्रत्येक भारतीयाला मजबूत आणि समृद्ध देशासाठी कार्य करण्यास प्रेरित करते.

भारतीय लष्कराच्या सार्वजनिक माहिती विभागाच्या अतिरिक्त महासंचालनालयाने देखील ट्विट केले, 'लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे आणि भारतीय लष्कराच्या सर्व श्रेणीतील अधिकारी पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी लढा देणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शूर जवानांना श्रद्धांजली वाहिली. 14 फेब्रुवारी 2019 दहशतवाद्याच्या भ्‍याड हल्‍ल्‍यात जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. देशभरातून नेते आणि अभिनेते पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या अमर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

हे ही वाचलं का  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT