पुढारी ऑनलाईन : गडचिरोलीतील सध्याची परिस्थिती पाहता येथील पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना राज्य सरकारने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते हे सध्या गडचिरोली दौऱ्यावर आहेत. त्यांनी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, गडचिरोलीतील परिस्थिती सध्या भयानक आहे. आत्तापर्यंत येथील १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यभर १० हेक्टर क्षेत्र हे बाधित झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याला महत्त्व देत, तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा. येथील पुरात नागरिकांच्या घरांचेही मोठे नुकसान झाले असून, याचेही तात्काळ पंचनामे करण्यात येऊन या भागातील पूरग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.