Latest

Congress Protest : पोलिसाची कॉलर धरत काँग्रेसच्या महिला नेत्याची दबंगगिरी

अमृता चौगुले

हैदराबाद; पुढारी ऑनलाईन : काँग्रेसचे (congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ईडीकडून (ED) सुरु असलेल्या चौकशी निषेधार्थ काँग्रसने देशभरात आंदोलन (congress protest) छेडले आहे. आक्रमक झालेल्या काँग्रेस नेत्यांची पोलिसांकडून धरपकड देखिल सुरु आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तेलंगनातील एका महिला नेत्याने आंदोलनादरम्यान चक्क पोलिसाची कॉलरच धरली. तो पोलिस त्या महिला नेत्यास कॉलर सोडण्यास सांगत होता, पण बराच वेळ त्या महिला नेत्याने त्या पोलिसाचे कॉलर सोडली नाही. शिवाय त्या पोलिसाच दम भरला तो वेगळाच. पोलिसांच्या या झटापटीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. सध्या हा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्याप्रमाणात व्हायल होत आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) (The Enforcement Directorate) सलग तिसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची तब्बल २८ तास चौकशी करण्यात आली आहे. नॅशनल हेरॉल्ड आणि एजेएल दरम्यानच्या व्यवहारातील मनीलॉड्रिंग प्रकरणी इडी राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. आपल्या नेत्याबाबत सुरु असलेल्या चौकशीचा निषेध (congress protest) करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी देशभरात निदर्शने करण्यात आली.

हैदराबाद येथे तेलंगना काँगेसच्या वतीने देखिल रस्त्यावर उतरुन निदर्शने (congress protest) करण्यात आली. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना हटविण्याचा प्रयत्न केला. त्यावर नाराज झालेल्या महिला काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी (congress leader renuka chowdhury) यांनी चक्क पोलिसाची कॉलरच धरली. रेणुका चौधरी यांनी काही केल्या त्या पोलिसाची कॉलर सोडलीच नाही. तो पोलिस कर्मचारी कॉलर सोडण्यास सांगत होता पण, चौधरी यांनी त्याचे न ऐकता उलट त्यालाच दम भरला. अखेर एका महिला पोलिसाने मध्ये येत रेणुका चौधरी यांनी पोलिस कर्मचाऱ्याची धरलेली कॉलर सोडवली आणि त्यांना ताब्यात घेत पोलिस व्हॅनमध्ये बसवले. या घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ एएनआयने आपल्या ट्वीटर हॅन्डलवर शेअर केला आहे. या पोस्टला तब्बल ४६ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या हा व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे.

राहुल गांधी यांच्या चौकशी विरुद्ध सुरु असलेल्या निदर्शनात हैदराबाद येथे काँग्रसकडून 'चलो राजभवन' आंदोलन (congress protest) करण्यात आले. यावेळी काँग्रेस कमिटीचे प्रमुख आणि खासदार ए. रेवंद रेड्डी, काँग्रेसचे नेते मल्लू भट्टी विक्रमार्क तसेच अन्य नेत्यांसह आंदोलकांनी यावेळी राजभवनकडे मोर्चा वळविला. दरम्यान खरबदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी सर्व नेत्यांसह आंदोलकांना ताब्यात घेतले. सुत्रांच्या माहितीनुसार आंदोलनामुळे खैरताबाद सर्कलसह त्याच्या आसपासच्या परिसरात वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. तसेच काही आंदोलकांनी शासकीय बसवर उभे राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

SCROLL FOR NEXT