बीजिंग; वृत्तसंस्था : चीनचे नव्याने झालेले राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना प्रामुख्याने विद्यार्थ्यांमधून वाढता विरोध होऊ लागल्याचे स्पष्ट झालेआहे. 16 ऑक्टोबर रोजी जिनपिंग यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्याच्या दोन दिवस आधी म्हणजे 14 ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरोधात एल्गार पुकारला होता.
बीजिंगमधील एका पुलावर नो ग्रेट लीडर असे जिनपिंग यांच्या निषेधाचे मोठमोठे फलक लावण्यात आले होते. कोरोनाकाळातील लॉकडाऊन आणि निर्बंधांवर या बॅनरच्या माध्यमातून कडक टीका करण्यात आली होती. आता हेच बॅनर चीनमधील हुकूमशाही राजवटीविरोधात उफाळून आलेल्या सार्वत्रिक संतापाचे कारण बनले आहेत. चीनमधील आठ शहरांमध्ये जिनपिंग यांच्याविरोधात लोकशाही समर्थकांकडून छुपी निषेध मोहीम चालवली जात असल्याचे वृत्त ब्लुमबर्गने दिले आहे.
चीनमधील लोकशाहीच्या कट्टर समर्थकांकडून व्हॉईस ऑफ सीए या नावाने इन्स्टाग्राम खाते चालवले जाते. त्यापैकी एकाने ब्लूमबर्गशी बोलताना सांगितले की, शेंझेन, शांघाय, बीजिंग, ग्वांगझू यासारख्या आठ मोठ्या शहरांमध्ये जिनपिंग यांच्याविरुद्ध जोरदार मोहीम उघडण्यात आली आहे.
स्वच्छतागृहे बनली निषेधाची केंद्रे
चीनमध्ये बहुतांश सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे लोकशाही समर्थक आता छुप्या पद्धतीने आपला निषेध व्यक्त करत आहेत. उपलब्ध माहितीनुसार काही शहरांतील सार्वजनिक स्वच्छतागृहांत जिनपिंगविरोधी निषेध फलक लावण्यात आले आहेत. तसेच काही शाळांच्या सूचना फलकांचा वापरही या कारणासाठी केला जात आहे. एवढेच नव्हे तर हुकूमशाही झुगारून द्या, असा मोठा फलक बीजिंगमधील
एका प्रसिद्ध चित्रपटगृहात लावण्यात आला आहे.
अधिक वाचा :