पाक क्रिकेटपटूच्या मुलीला भारतात मिळाले जीवदान | पुढारी

पाक क्रिकेटपटूच्या मुलीला भारतात मिळाले जीवदान

बंगळूर; वृत्तसंस्था : पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सिकंदर बख्त यांच्या मुलीला भारतात जीवदान मिळाले आहे. दोन वर्षीय या चिमुकलीचे नाव अमायरा असे आहे. तिच्यावर अस्थिमज्जा प्रत्यारोपण म्हणजेच बोन मॅरो ट्रान्सप् लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. बंगळूर येथील नारायणा हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.

अमायराला म्युकोपॉलिसे केराइडोसिस हा दुर्मीळ आजार आहे. हा आजार रुग्णाच्या डोळ्यांवर आणि मेंदूसह शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम करतो. या आजारग्रस्त बहुतेक मुलांना वयाच्या 19 व या वर्षी अपंगत्व येते. त्यानंतर मृत्यूचा धोकाही असतो. बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा यावरील एक उपाय आहे.

पृष्ठवंशीय प्राण्यांच्या या शरीरात प्लीहा अवयव असतो. हे अवयव मानवी शरिरात रोगप्रतिकारक शक्तीतीचे काम करते. प्लीहा शरीरातील रक्तांच्या पेशींची पातळी नियंत्रित करते. जुन्या किंवा खराब झालेल्या लाल रक्तपेशी काढून टाकतात, अशी माहिती अमायरावर उपचार करणारे डॉ. सुनील भट यांनी सांगितले.

अमायराच्या आईने मानले आभार

बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेच्या चार महिन्यानंतर आता अमायराच्या शरीरातील एन्झायम सामान्यपणे काम करत आहे आणि तिची तब्येत सुधारत आहे. अमायराच्या आईने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, आम्हाला या आजाराविषयी काहीच माहिती नव्हती. बरेच संशोधन केल्यानंतर डॉ. संजय भट यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अमायरला भारतात उपचारासाठी घेऊन आलो. येथील डॉक्टरांच्या पथकाने खूप मदत केली.

Back to top button