Latest

Valentine Day : ‘व्हॅलेनटाईन डे’ला प्रपोज करणे तरुणाला पडले महागात

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी ऑनलाईन : नालासोपारा येथे 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने एका तरुणाने तरुणीवर प्रेम व्यक्त केले. पण, हे प्रेम व्यक्त करणे त्याच्यासाठी दुःस्वप्न ठरले. तरुणाने मुलीला प्रपोज केल्यानंतर मुलीने आईच्या मदतीने त्याला भर चौकात चांगला चोपून काढला. ही घटना मुंबईतील नालासुपारा परिसरात दुपारी ४ च्या सुमारास घडली. (Valentine Day)

व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने या तरुणाने आपल्याला आवडणाऱ्या मुलीस प्रपोज करुन मनातील इच्छा व्यक्त करण्याचा निश्चय केला. त्याने मुलीला रस्त्यात अडवून प्रेमाची विचारणा केली. त्या मुलीला तरुणाने केलीली ही कृती अजिबात आवडली नाही. आपल्या सोबत छेडछाडी झाल्याचा राग मनात धरुन संबधित तरुणीने ही गोष्ट आपल्या आईला सांगितली. त्या मुलीने व आईने प्रेम व्यक्त करणाऱ्या तरुणाला रस्त्याच्या मधोमध घेऊन चांगला चोप दिला. यावेळी विनयभंग केल्याचा आरोप करत आई व मुलीने त्या मुलाला चांगलाच धुतला. या संधीचा फायदा आजूबाजूच्या लोकांनी त्या तरुणालाचा चांगलाच समाचार घेतला. (Valentine Day)

ही सर्व घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली असून याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. पण, या प्रकरणाचा पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नाही. तसेच तो तरुण आणि पीडित मुलगी ही त्याचा परिसरात राहणारे आहेत. तेथील नागरिकांनी तक्रार केली की या परिसरात वारंवार मुलींना अशा कृत्यांना सामोरे जावे लागते.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT