Latest

Parineeti Chopra : बहीण परिणीतीच्या साखरपुड्यात चर्चा प्रियांकाच्या साडीची

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ( Parineeti Chopra ) आणि खासदार राघव चढ्ढा यांचा मोठ्या धुमधडाक्यात साखरपुडा पार पडला. या सोहळ्याला परिणितीची बहीण आणि बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने परदेशातून भारतात येऊन धमाल केली. यावेळी प्रियांकाच्या साडीसह लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. परिणीतीच्या साखरपुड्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अभिनेत्री परिणीती चोप्रा ( Parineeti Chopra ) आणि आप नेते राघव चड्ढा यांनी एका खास ग्रँड पार्टीचे आयोजन करून एकमेकांना एंगेजमेंट रिंग परिधान केली. यावेळचे दोघांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. या खास सोहळ्यासाठी  प्रियांका चोप्रा परदेशातून भारतात आली होती. या कार्यक्रमात प्रियांकाच्या लाइम ग्रीन कलरच्या रफल साडीने चारचाँद लावलेत. रफल साडीसोबत तिने स्ट्रॉपलेस ब्लाऊजदेखील परिधान केले आहे. यासोबत प्रियांकाने मोकळे केस, डायमंड नेकलेस आणि पेंडेंट, मिनिमम मेकअप, लिपस्टिक आणि हाय हिल्सने लूक पूर्ण केला आहे.

प्रियांकाचा हा पारपांरिक लूक चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे. मात्र, प्रियांकाने परिधान केलेल्या या साडीची किंमत ७८,७०० रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. यावरून बहिणीच्या साखरपुड्यात इतकी महागडी साडी प्रियांकाने नेसल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यासोबत प्रियाकांने भाऊ आणि नेतेवाईकांसोबतही फोटो काढले आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT