Latest

Priyanka chopra’s styling : प्रियांका चाेप्रा म्हंटल्यावर चर्चा होणारच… 

Sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या अभिनयाने बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra). प्रियांका ही अधिक चर्चेतील राहणारी अभिनेत्री आहे. ती तिच्या फॅशनसेन्ससाठी ओळखली जाते. सध्या तिच्या ड्रेसची चर्चा सोशल मीडियीवर सुरु आहे. तिने बॅकलेस असा ब्लॅक आणि व्हाईट वनपीस घातला आहे. तिचा नेकलेसही लक्षवेधी ठरत आहे. नेकलेसमूळे तिच्या सौंदर्य आणखी खुलले आहे.

Priyanka Chopra
Priyanka Chopra

Priyanka chopra : 'ऑलवेज अ  स्टनर' 

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka chopra) आणि तिचा पती हॉलिवूड गायक निक जोनास (Nick Jonas) हे लोकप्रिय जोडप्यांपैकी एक. प्रियांका सोशल मीडियावरील कोणत्या ना कोणत्या कारणांनी नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री. मध्यंतरी तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या नावासमोरील पती जोनासचे नाव हटवले होते. त्यामूळे ती चर्चेत आली होती. कधी आपला पार्टनर निक जोनास, आपली मुलगी मालती मेरी चोप्रा जोनास तर कधी फॅशनसेन्समूळे ती चर्चेत असते. नुकतेच तिने आपले लेटेस्ट फोटो इन्स्टाग्राम अकाउंटला शेअर केले आहेत. यामध्ये तिने बॅकलेस असा ब्लॅक आणि व्हाईट वनपीस घातला आहे.

तिच्या या फोटोंवर माधुरी दीक्षित, बिपाशा बासूसह अनेक दिग्गज कलाकारांनी कमेंटस् केल्या आहेत. 'ऑलवेज अ स्टनर' अशी कमेंट माधुरी दीक्षितने केली आहे. चाहत्यांनी या फोटोंवर कमेंटचा वर्षाव केला आहे.

हेही वाचलतं का? 

SCROLL FOR NEXT