Latest

Citadel : प्रियांका चोप्राची भूमिका असलेल्या सिटाडेलची जगभरात धूम

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरातील सर्वात लोकप्रिय रिलीजमध्ये प्रियांका चोप्राचा सिटाडेल अव्वल क्रमांकावर पोहोचला आहे. या सर्व गोष्टींसाठी प्रियांकाने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

सिटाडेल प्रियांका चोप्रा जोनासचा स्पाय थ्रिलर चित्रपट असून जागतिक स्तरावर अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर पहिल्या स्थानावर आहे. प्रियांका चोप्रा जोनासचा स्पाय थ्रिलर सिटाडेल नुकताच जागतिक रिलीज झाला. या स्पाय थ्रिलरची चर्चा सर्वत्र होत आहे.

सिटाडेलने एक नवीन विक्रम प्रस्थापित केल्यामुळे आणि जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय रिलीजमध्ये ते प्रथम स्थानावर आला आहे. प्रियांकाने जागतिक स्तरावर उत्तम काम केलं आहे. यासंदर्भात तिने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्टदेखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने कृतज्ञता व्य़क्त केली आहे. सिटाडेल सर्वात लोकप्रिय शोमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे.

रुसो ब्रदर्स या मालिकेच्या निर्मात्यानेही तिला 'सिनेमाची महिला टॉम क्रूझ' असं म्हटलं आहे.सिटाडेल व्यतिरिक्त, प्रियांकाकडे राज्यप्रमुख आणि जी ले जरा हा नवा प्रोजेक्ट आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT