Latest

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले श्रीकांत शिंदे, फोटो ट्विट करत शिवसेनेचा शिंदेंवर निशाणा

दीपक दि. भांदिगरे

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे बसून कामकाज हाताळत असल्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी हा फोटो ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. "महाराष्ट्र राज्याला सुसंस्कृत राजकीय इतिहास आहे व मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला देखील तितकाच आहे. आदित्य ठाकरे हे मंत्री म्हणून कामकाज सांभाळत असल्याची यांना अडचण होती. पण स्वतःचे पुत्र आमदार किंवा मंत्री नसताना मुख्यमंत्रीपदाचा अनादर करत असल्याची त्यांना काहीच हरकत नाही!" असे प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

चतुर्वेदी यांनी ट्विट केलेल्या फोटोत श्रीकांत शिंदे एका कार्यालयात बसलेले दिसतात. ते ज्या खुर्चीत बसले आहेत त्यामागे महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री असे लिहिलेले दिसते. शिंदे यांच्या समोर काही लोकही दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनीही हा फोटो ट्विटवर शेअर केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की 'खा. श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?'. त्यांनी हे ट्विट एकनाथ शिंदे यांना टॅग केले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT