Latest

Priyanka Chahar Choudhary चं मोठं वक्तव्य, ऑडिशन दिले पण कुणी काम दिलं नाही

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस सीजन १६ मध्ये आपल्या स्पष्टोक्ती अंदाजामुळे तिने सर्वांची मने जिंकली. प्रियंका चाहर चौधरी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. आता तिने सांगितले आहे की, टेलीव्हिजन कलाकारांना चित्रपटांमध्ये काम मिळणे इतकं सोपं नसतं. बिग बॉस सीजन १६ मध्ये ती सेकंद रनरअप ठरली होती. 'उडारिया' शोतून लोकप्रिय झालेली टीव्ही अभिनेत्री प्रियंका जेव्हादेखील कोणतीही पोस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर करते, तेव्हा फॅन्स प्रतिक्रिया देतातचं.

सलमान खानच्या शोने तर प्रियंका चाहरच्या फॅन फॉलोईंगमध्ये चारचाँद लावले होते. जेव्हा हा शो संपला होता, तेव्हा सलमान खानने प्रियंकाला बाहेर भेटण्यासाठी तिला सांगितले होते. तेव्हा प्रत्येकाला वाटलं होतं की, बिग बॉस १६ च्या कंटेस्टेंटसाठी बॉलीवूडचे दरवाजे उघडले. आता प्रियंका चाहर चौधरीने सांगितले की, टीव्ही अभिनेत्रींना बॉलीवूडमध्ये लवकर काम का मिळत नाही.

बिग बॉस सीजन १६ ची फायनलिस्ट प्रियंका चाहर चौधरी शोतून बाहेर झाली होती. ती एकता कपूरच्या शोचाएक हिस्सा बनणार होती. पण, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर असे होताना दिसले नाही. प्रियंका चाहर सलमान खानच्या रिॲलिटी शोनंतर काही म्युझिक व्हिडिओजमध्ये दिसली.

याशिवाय सोशल मीडियावर ती आपल्या फॅन पोस्टच्या माध्मातून जोडली गेली होती. आता एका वेबसाईटशी बोलताना तिने आपल्या आगामी प्रोजेक्ट्सवर बातचीत केली. पण, सोबतच तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. कशाप्रकारे टीव्ही कलाकारांना लवकर चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये कामे मिळत नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT