Latest

Ayodhya Ram Mandir : अयोध्या रघुकुलाची राजकन्या श्रीरत्नादेवी कोरियाची महाराणी!

Arun Patil

अयोध्या, वृत्तसंस्था : प्रभू श्रीरामचंद्रांच्या वंशात जन्मलेली राजकुमारी श्रीरत्ना ही कुण्या एके काळी कोरियाची (फाळणीनंतर उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया असे आज हे 2 देश) महाराणी होती, हे किती जणांना आज खरे वाटेल. कोरियन इतिहास मात्र हा सूर्यवंशी वारसा शतकानुशतके मोठ्या अभिमानाने सांगत-मिरवत आलेला आहे. (Ayodhya Ram Mandir)

संबंधित बातम्या : 

आजपासून 2 हजार वर्षांपूर्वी रघुकुलातील राजा पद्मसेन व राणी इंदुमती यांच्या पोटी जन्मलेली अयोध्येची राजकुमारी श्रीरत्ना ही दैवी प्रेरणेने समुद्रमार्गाने एका विशेष जहाजातून कोरियाला पोहोचली आणि कोरियाची महाराणी बनली. कोरियाचे तत्कालीन सम्राट सुरो यांच्याशी श्रीरत्नाचा विवाह झाला होता. स्वत:ला त्यांचे वंशज म्हणविणारे आजही दक्षिण कोरियात ढिगाने आहेत. (Ayodhya Ram Mandir)

श्रीराम जन्मभूमीच्या जागेचा अंतिम निकाल भारतीय सर्वोच्च न्यायालयात लागला, तेव्हा दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलच्या आनंदाला कोण भरते आले होते!

दक्षिण कोरियाच्या दिल्लीतील राजदूतांनी थेट भारत सरकारला विनंती केली की, आम्हालाही (दक्षिण कोरियालाही) राम मंदिर उभारणीच्या आनंदात सहभागी करून घ्या… तेव्हा राजधानी दिल्लीही थक्क झाली. कोरियन राजदूताने वरीलप्रमाणे नाते सांगितले तेव्हा क्षणभर भारतीय अधिकार्‍याचा विश्वास बसेना… नंतर सारा उलगडा झाला… उत्तर प्रदेश सरकार आणि दक्षिण कोरियातर्फे मग संयुक्तरीत्या कोरियन महाराणी श्रीरत्नादेवींच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'राणी हो पार्क' ('हो' हे श्रीरत्नादेवींचे कोरियन नाव) या स्मारकाचे काम झाले. तशी माहिती दक्षिण कोरिया सरकारला पाठविण्यात आली.

दक्षिण कोरियाच्या प्रथम महिला किम जोंग सुक या स्वत: स्मारकाच्या उद्घाटनाला आल्या होत्या. अयोध्या हे आमचे मामाचे गाव, असे भावपूर्ण उद्गार तेव्हा किम जोंग सुक यांनी काढले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजींसह किम जोंग सुक यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन झाले होते.

शरयू तटावर म्हणजे आजोळी (मामाच्या गावाला) कोरियाच्या या महाराणीचे म्हणजेच श्रीरत्नादेवींचे भव्य स्मारकही दिमाखाने उभे आहे.
तीन वर्षे या स्मारकारचे काम चालले होते. दक्षिण कोरिया आणि भारताच्या आध्यात्मिक-सांस्कृतिक नात्याचे ते प्रतीक आहे.

'रामचरितमानस'कार गोस्वामी संत तुलसीदास घाटालगतच हे स्मारक आहे. त्यावर थोडाथोडका नव्हे, तर चक्क 21 कोटी रुपये खर्च केला गेला आहे. श्रीरत्नादेवी म्हणजे अयोध्येची बहीणच शेवटी… आजोळी इतके लाड तर हक्काचेच! स्मारकात जावयालाही मोठा मान देण्यात आलेला आहे. राजा सुरो यांच्यासाठी खास किंग पॅव्हेलियन तयार केलेले आहे. श्रीरत्नादेवींच्या कोरियापर्यंतच्या प्रवासाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी साकारलेली एका जहाजाची प्रतिकृती लक्षवेधी आहे. स्मारकाला रामभक्तांकडून उदंड प्रतिसाद आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT