अगदी छोट्या, किरकोळ समस्यांपासून दिर्घकाळच्या कटकटी आणि आजारपणापर्यंत अशा कुठल्याही स्वरूपात मासिक पाळीशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात. तक्रार कुठलीही असली तरी तिची तीव्रता आणि वारंवारिता लक्षात घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित ठरते. मासिक पाळी चालू असलेल्या स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळणारी समस्या म्हणजे प्रायमरी डिस्मेनोरिया.
मासिक पाळीदरम्यान पेटके किंवा क्रॅप येण्याला डिस्मेनोरिया म्हणतात. याचे प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन प्रकार आहेत. प्रायमरी डिस्मेनोरिया असेल तर ओटीपोटाशी संबंधित कोणताही आजार नसतानाही, पाळीच्या सुरुवातीलाच, ओटीपोटाच्या खालच्या भागात पेटके येतात. दुसरीकडे, सेकंडरी डिस्मेनोरिया एंडोमेट्रियोसिससारख्या विकृती चिकित्सेमधून उत्पन्न होणाऱ्या वेदनामय मासिक पाळीशी संबंधित असतो.
सामान्यत: डिस्मेनोरिया ही समस्या सुमारे ९० टक्के स्त्रियांमध्ये आढळते. गंभीर स्वरूपाचा डिस्मेनोरिया चालूच राहिल्यास त्यातून अनेक धोके उत्पन्न होऊ शकतात. उदाहरणार्थ- कमी वयापासून पाळी येणे, ती दीर्घकाळ चालणे इत्यादी. धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा कमी करण्याच्या प्रयत्नांचाही वेदनामय मासिक पाळीशी संबंध असतो. गर्भाशयाच्या अत्याधिक आकुंचनाने, अत्याधिक प्रोस्टग्लॅडिन्स अथवा इतर काही आजारांमुळे सेकंडरी डिस्मेनोरिया होऊ शकतो. त्यामुळे हा त्रास अंगावर काढू नये. योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार घ्यावेत.
हेही वाचा :