स्त्रियांच्या पाळीतील तक्रारी | पुढारी | पुढारी

स्त्रियांच्या पाळीतील तक्रारी | पुढारी

डॉ. सौ. सपना गांधी 

किशोरवयीन मुलींपासून ते स्त्रियांपर्यंत म्हणजेच मासिक धर्म चालू झाल्यापासून ते रजोनिवृत्तीच्या कालावधीत स्त्रियांना पाळीच्या बर्‍याच तक्रारी असतात. तर आज आपण इथे पॉलिसिस्टीक ओव्हॅरीयन डिसीज (PCOD) या प्रकारच्या आजारावर चर्चा व होमिओपॅथिक उपाययोजना या बाबतीत चर्चा करणार आहोत.

‘पीसीओडी’ म्हणजेच अबनॉर्मल गाठ, स्त्रीयांच्या अंडाशयाला तयार होते. त्यामुळे अनियमित पाळी व कधीकधी 5-6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त पाळी तडावते. वजन वाढते, हनुवटी, गालावर व ओठांच्या वरील बाजूस नको असलेले केस येणे, पाळीमध्ये ओटीपोटात खूप दुखणे, असह्य वेदना होणे, पुरुषी हार्मोन अ‍ॅन्ड्रोजनचे प्रमाण वाढलेले असते.

‘पीसीओडी’ची प्रमुख कारण म्हणजे हार्मोनल डिसबॅलन्स होणे. स्ट्रेस, टेन्शन, काळजी-चिंता, अनियमित खाण्यांच्या सवयी, कधी कधी अनुवंशिकता ही महत्त्वाची असते. आजुबाजूच्या वातावरणाचाही शरीर-मनावर इफेक्ट होत असतो.

‘पीसीओडी’ची प्रामुख्याने लक्षणे म्हणजे ते प्रत्येक स्त्रीच्यानुसार वेगवेगळी असू शकतात. काहींना तर ‘पीसीओडी’ची लक्षणेच जाणवत नाहीत तर काहींची Oily Skin, पिंपल्स सारखे येत राहतात. अनियमित पाळी किंवा पाळी अजिबातच येत नाही कित्येक महिनो न् महिने, नको तिथे नको असलेले केस येत राहणे (पुरुषी हार्मोन वाढल्याने), वजन वाढणे, काही महिलांमध्ये अ‍ॅबॉर्शन होणे किंवा मूल अजिबातच न राहणे. कारण अनियमित बीज निर्मिती असते, वेलव्हेट प्रकारचे पॅचेस स्कीनवर येत राहतात. ‘पीसीओडी’च्या महिलांमध्ये डिप्रेशनचे प्रमाण जरा जास्तच असण्याची शक्यता असते, कारण हार्मोनल डिसबॅलन्स असतो. कधी तर डॅन्ड्रफ होते, बी.पी. वाढणे हेही लक्षणे दिसतात. ‘पीसीओडी’ हे डायग्‍नोसीस करण्यासाठी सोनोग्राफी व ब्लड टेस्ट उपयोगी पडतात.

Androgen चे रक्‍तातील प्रमाण वाढणे व वरील लक्षणांची जाणीव झाली तर ‘पीसीओडी’ हे कन्फर्म असे समजावे. शिवाय USG मध्ये अंडाशयाला एक किंवा अनेक गाठी दिसणे, असणे हेही ‘पीसीओडी’चे निदान करण्यासाठी उपयुक्‍त ठरते.

होमिओपॅथिक उपाययोजनेबरोबरच खाण्यापिण्यातून समतोल व सकस आहार, भरपूर पालेभाज्या व फळे, प्रोटिन व कॅल्शियमचे योग्य शरीरातील प्रमाण राहणे फार महत्त्वाचे आहे.

होमिओपॅथिक औषधोपचार हे पूर्ण उपचार पद्धती आहे. कसलेही इंन्जेक्शन/ऑपरेशन न करता, नैसर्गिक पद्धतींनी आपल्या शरीरातील दोष कमी होऊन रुग्णाला पूर्णपणे ‘पीसीओडी’पासून मुक्‍त करता येते. म्हणूनच होमिओपॅथिक औषधे ही शास्त्रशुद्ध पद्धतीनींच व सर्व प्रिन्सीपल्स व त्या त्या Personality नुसार कॉन्स्टिट्यूशनल औषध कमीत कमी मात्रेत जर दिले गेले तर ते मन व शरीर सक्षम बनवण्यास व प्रतिकार शक्‍ती वाढविण्यास उपयोग होतो व पेशंट रोगमुक्‍त ‘पीसीओडी’ मुक्‍त होऊन त्यांच्या पाळींच्या तक्रारी नाहीशा होतात व ज्यांना मूल राहत नाही त्यांनाही मूल राहण्यास फायदा होतो. चला तर मग नैसर्गिकरीत्या होमिओपॅथी ट्रिटमेंटचा फायदा नक्‍की घ्या.

खालील काही होमिओपॅथिक औषधे देत आहेत त्या फक्‍त होमिओपॅथिक डॉक्टरांकडूनच घ्याव्यात.

1) एपीस मेल (Apis Mel)- या प्रकारचे रुग्ण पोटदुखीने त्रस्त झालेले असतात. टोचल्यासारखे दुखत असते. पाळी तडावलेली असते. ती कधी कधी मेडिकलच्या हार्मोनच्या गोळ्या घेतल्याशिवाय येतच नाही. सर्वांगावर सूज असते. वजन वाढलेले असते. डोळ्याखाली पण सूज असते. अंडाशय व पिशवीवर सूज येऊन पाळीत खूप त्रास होतो. अंडाशयाच्या दोन्ही बाजूस Cyrt असू शकते.

या प्रकारातील मुली व स्त्रिया मेहनती व कष्टाळू असतात. कुठलेही काम मन लावून करतात. कधी कधी ईर्षाभावही असतो, अस्वस्थता येते, विधवा स्त्रियांमध्ये जास्त करून दिसून येते.

2) कोलोसिंथ (Colocynth) – पोटदुखी प्रचंड असते की, ‘पीसीओडी’चे रुग्ण खूपच पोटदुखींनी हैराण झालेले असतात. पोटात क्रॅम्प येतात. अनियमितपणा पाळीमध्ये येतो.

3) काली बीच (Kali Bich) – एका ठराविक ठिकाणी दुखावा असतो की जो एका बोटांनी ही कव्हर करू शकेल आणि सारखे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी असे दुखावा होत राहतो. यांच्यामध्ये पित्ताचा त्रासही असतो. ‘पीसीओडी’ हे डाव्या बाजूचे असते. यातील स्त्रिया खूप हट्टी असतात. यांचे पाळीतील स्त्राव खूप चिकट, तार धरतात इतके चिकट असतात.

4) लॅकेसीस (Lachesis) – स्त्रियांच्या पाळीमध्ये अनियमता तर असतेच त्याच बरोबर काळपट, घट्ट Bleeding चा त्रास होत अति प्रमाणात होत असते. डावी ‘पीसीओडी’ असून पोटदुखी खूप असते. स्त्रिया या उष्ण प्रकृतीच्या असून खूप चंचल, हुशार, बुद्धिमान असतात. वेळप्रसंगी बदल/सूड घेण्यास कमी करत नाहीत. ईर्षा असते हार्मोनल डिस्टर्बन्स असतो. शक्यतो मेनोपॉजच्या काळात त्रास होत असतो.

5) सिलीसिया (Silicea) – या मुली/स्त्रिया हुशार, सिन्सीयर, अभ्यासू अशा असतात. शिवाय आज्ञाधारकही असतात. पाळीतले बिघाड, अनियमितता, अनुवंशिकता असते. ‘पीसीओडी’ ला उत्तम औषध आहे, थंड प्रकृतीच्या असून घशाचा/फुफ्फुसाचा विकार होऊ शकतो.

6) पोडोफायलम् (Podophyllum) – मानसिक ताणतणाव, विचार, भावनिक चढ-उतार, ही कारणे ‘पीसीओडी’ ची असतात. स्नायूंचे शिथिल असतात. त्यामुळे शौचास गेल्यास जागा व पिशवी बाहेर येत असते. पोटदुखी ही पोटावर झोपल्यावर बरे वाटते, जुलाबही बरे होतात.

7) थुजा (Thuja) – हे औषध अंडाशयातील गाठीवर तर उपयोग पडतेच, परंतु शरीरात अशा कुठेही गाठी होत राहतात. अशा स्त्रियांना आयुष्य जगण्यात इंटरेस्ट नसतो. आत्मविश्‍वासाचा अभाव झालेला असतो. लसींचे साईड इफेक्ट होतात. या स्त्रियांना ठराविक फिक्स असे मत असतात. तसे भास होतात. थोडा भांडखोर प्रवृत्ती असते.

8) आयोडम् (Iodum) – उष्ण प्रकारच्या स्त्रिया ‘पीसीओडी’चे मुख्य कारण थायरॉईड ग्रंथीचे विकार, हार्मोनल डिस्ट्रबन्स इ. खूप भूक लागते. खाल्‍ले तरी परत परत सारखे सारखे खावंस वाटतं. उजव्या बाजूस ‘पीसीओडी’मध्ये उपयोगी पडते.

Back to top button