Latest

G 20 Dinner : निमंत्रण पत्रिकेवर President of India ऐवजी लिहिले President of Bharat; वाचा सविस्तर

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : G 20 च्या स्नेहभोजनाची निमंत्रण पत्रिका समोर येताच आता एका नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. या वादाच कारण आहे, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या पदाचे संबोधन. या निमंत्रण पत्रिकेत मूर्मू यांच्या पदाचा उल्लेख President of India ऐवजी President of Bharat असे लिहिले आहे. या निर्णयावर विरोधी पक्षांकडून तीव्र टीका झाली आहे, ज्यांनी सरकारवर देशाचे नाव बदलून भारत करण्याचा आरोप केला आहे.

या स्नेहभोजनासाठी केंद्राने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवेगौडा यांनाही निमंत्रण दिले आहे. JD(S) चेप्रमुख देवेगौडा यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले. काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनाही या स्नेहभोजनाचे आमंत्रण आहे पण तेही दीर्घकाळापासून आजारी आहेत.

या स्नेहभोजनाला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांची या कार्यकमात जुलै 2022 नंतर होणारी पहिलीच भेट असेल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या G20 डिनरसाठी आमंत्रित केलेले नाही. या प्रकारावर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने टीका केली आहे. सत्ताधारी विरोधी पक्षाच्या नेत्यांना किंमत देत नाहीत म्हणून, त्यांनी G20 शिखर परिषदेसाठी आमंत्रण दिले नाही. मलाही या डिनरसाठी आमंत्रण दिले गेलेले नाही, असे उद्गार राहुल गांधी यांनी या स्नेहभोजना बाबत काढले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील या स्नेहभोजनाला उपस्थित राहण्यास सहमती दर्शवली आहे. दिल्ली येथे 9-10 सप्टेंबर दरम्यान नियोजित G20 शिखर परिषद, यूएस, यूके, कॅनडा आणि युरोपियन युनियनमधील देशांच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी दिल्ली सज्ज झाली आहे.

इथे आहे स्नेहभोजन 

दिल्लीत 30 कोटी रुपये खर्चून बनवलेल्या शंखाकृती ठिकाणी हे स्नेहभोजन पार पडणार आहे. ज्यामध्ये भारतीय खाद्यपदार्थांचा मेन्यू असेल आणि बाजरी सारख्या धान्यापासून बनवलेल्या पदार्थांवर भर दिला जाणार आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT