पुढारी ऑनलाईन : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले हटके फोटोज शेअर करत असते. सध्या प्राजक्ताच्या चंदेरी सिल्क साडीतील खास फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर स्पिच रंगाच्या चंदेरी सिल्क साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. या साडीत प्राजक्ता कमालीची सुंदर आणि ग्लॅमरस दिसतेय. या फोटोतील खास म्हणजे, प्राजक्ताने साडीसोबत ब्लॉऊज परिधान केलेले नाही. यामुळे चाहत्यांनी तिच्या फोटोवर कॉमेंन्टस करताना प्रश्नाचा भडिमार सुरू केला आहे.
शेअर केलेल्या एका फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'शारद सुंदर चंदेरी राती, थंड या हवेत घेऊन कवेत…' असे लिहिले आहे. तर दुसऱ्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'नवीनतम फोटोशूट येत आहेत, सुंदर चंदेरी सिल्क परिधान करत आणि बरेच काही… 'असे लिहिले आहे. मोकळ्या केसांसह न्यूड मेकअपने तिच्या सौदर्यांत आणखी भर घातली आहे. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.
हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेंन्टसचा पाऊस पाडला आहेत. या एका युजर्संने तिचे कौतुक करताना 'लय भारी ❤️❤️', 'अति सुंदर ❤️ ❤️ ??', 'Beautiful❤️', 'Very beautiful पिल्लू, Gorgeous❤️❤️❤️??', 'Lovely ?', 'Looking beautiful ?❤️ and gorgeous,' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने 'नजर नको लागू देऊ रे ??', 'तेरे नैना हस दिये..♥️???', 'अप्रतिम सौंदर्य', 'प्यारी आपकी साडी', 'खूपच सुंदर दिसतेयस..?"परी"?, So cute ?', 'Wow ?', 'खुप सुंदर दिसतेय', 'सुंदर आणि कडक', 'नादखुळा ??' यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.
काही युजर्सनी तिच्यावर प्रश्नाचा भडीमार करत ट्रोल केले आहे. यात नेटकऱ्यांनी प्राजक्ताला साडी सावरता येत नाही तर नेसायची कशाला?, ब्लाउज घालायला विसरलीस काय?, सगळ ठीक आहे पण ब्लाउस कुठं आहे ? असे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यानी हार्ट आणि फायरच्या ईमोजीने कॉमेन्टस बॉक्स भरलेला आहे.
छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या शोमधून प्राजक्ता चाहत्यांच्या घराघरांत पोहोचली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्राजक्ताला 'कमला रायझिंग स्टार' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राजक्ता सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करून सक्रिय असते. तिच्या इन्स्टाग्रामवर १० लाखांहून अधिक फालोअर्स पाहायला मिळतात.
हेही वाचलंत का?