Latest

पदवी नसेल तर मुक्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी ठरते अवैध : सर्वोच्‍च न्‍यायालय

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मुक्त विद्यापीठातून मूलभूत ( बेसिक ) पदवी प्राप्‍त केलेली नाही, अशा विद्यार्थ्याने मुक्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्‍त केली तर ती अवैध ठरते, असे सर्वोच्‍च न्‍यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीवेळी नुकतेच स्‍पष्‍ट केले आहे. मुक्‍त विद्यापीठातून मूलभूत पदवी ( बेसिक डिग्री ) घेतली नसेल आणि थेट पदव्युत्तर पदवी प्राप्‍त केली असेल तर अशी पदवी वैध ठरत नाही, असे न्‍यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि संजय करोल यांच्या खंडपीठाने स्‍पष्‍ट करत याप्रकरणी तामिळनाडू उच्‍च
न्‍यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

तामिळनाडू लोकसेवा आयोगाने गट १ सेवा श्रेणीसाठी थेट भरती प्रक्रिया पार पाडली होती. या पदासाठी उमेदवारांना पदव्युत्तर पदवी अनिवार्य होती. उमेदवाराने मुक्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. यावेळी अशा पदवीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या निर्णयाला आव्‍हान देणारी याचिका तामिळनाडू उच्‍च न्‍यायालयात दाखल झाली होती. मूलभूत पदवी न घेता मुक्‍त मुक्त विद्यापीठातून प्राप्त केलेली पदव्युत्तर पदवी स्वीकार्य नाही, असे तामिळनाडू
उच्‍च न्‍यायालय स्‍पष्‍ट केले होते.

उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयाविरोधात याचिकाकर्त्याने सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्‍च न्‍यायालयानेही उच्‍च न्‍यायालयाचा निर्णय कायम ठेवत पदवी शिवाय मुक्‍त विद्यापीठातून घेतलेली पदव्युत्तर पदवी अवैध ठरते, असे स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT