Latest

students returning from Ukraine : युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या उर्वरित शिक्षणासाठी धोरणनिश्चिती व्हावी

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : युध्दग्रस्त युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या (students returning from Ukraine) उर्वरित शिक्षणासाठी केंद्र सरकारने धोरण निश्चिती करावी, अशी मागणी लोकसभेत विविध पक्षीय खासदारांनी सोमवारी शून्य प्रहरात केली. युक्रेनमध्ये प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी भारतीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जातात. युध्द सुरु झाल्यानंतर हजारो विद्यार्थी मायदेशी परतलेले आहेत.

युक्रेनमधील सुमी येथे अजूनही केरळमधील असंख्य विद्यार्थी (students returning from Ukraine) अडकलेले आहेत. त्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सरकारने उपाय योजावेत, अशी मागणी काँग्रेसचे आर. उन्नीथन यांनी केली. अर्धवट शिक्षण सोडून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या उर्वरित शिक्षणाची सोय भारतात केली जावी, असा मुद्दा वायएसआर काँग्रेसचे सदस्य पी. व्ही. मिधून रेड्डी यांनी मांडला. भारतातच या विद्यार्थ्यांचे राहिलेले शिक्षण होण्यासाठी आणखी वैद्यकीय महाविद्यालये उघडावीत, असेही ते म्हणाले. युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी बँकातून कर्ज घेतले आहे, त्यांचे कर्ज माफ केले जावे, अशी मागणी काँग्रेसचे के. सुरेश यांनी केली.

युक्रेनमधील सुमीमध्ये अडकलेले ६०० विद्यार्थी मायदेशी परतले (students returning from Ukraine)

युध्दग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या सहाशे विद्यार्थ्यांना पोलंडमार्गे भारतात आणण्यात आले आहे. पोलंडमधील रझेझोव्ह येथून एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण केले होते. शुक्रवारी सकाळी हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. युक्रेनमधील सुमी येथे हे विद्यार्थी अडकले होते व त्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारला विशेष मेहनत घ्यावी लागली होती

विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकारने पोलंडला तीन विमाने पाठविली होती. एकापाठोपाठ तिन्ही विमाने भारतात परतली. युक्रेन मध्ये अडकलेले विद्यार्थी व भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी सरकारने 'ऑपरेशन गंगा' मोहीम राबविलेली आहे. मोहिमेअंतर्गत आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यात आले आहे.

युक्रेनमधून ८०० विद्यार्थ्यांना आणणारी महाश्वेता चक्रवर्ती (students returning from Ukraine )

 रशिया-युक्रेन युद्धानंतर २४ वर्षीय महाश्वेता चक्रवर्ती  (Mahasweta Chakraborty) ही महिला वैमानिक चर्चेत आली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यात केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा ही मोहीम राबवली. या मोहीमेत महाश्वेताचे मोठे योगदान राहिले. युद्धग्रस्त युक्रेनमधून ८०० भारतीय विद्यार्थ्यांना महाश्वेताने सुखरूप भारतात परत आणले. तिने २७ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत ६ विमानांचे उड्डान केले.महाश्वेता चक्रवर्ती हिने युक्रेनच्या पोलंड आणि हंगेरीच्या सीमेवर अडकलेल्या ८०० हून अधिक विद्यार्थ्यांची सुटका केली. पोलंडमधून ४ आणि हंगेरीमधून २ निर्वासन उड्डाणे केली.

SCROLL FOR NEXT