

पुढारी ऑनलाईन; बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान ( aamir khan ) १४ मार्च रोजी ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे. आमिरने त्याच्या बॉलिवूड करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. 'थ्री इडियट्स' चित्रपटातील कॉलेज कुमार तर 'दंगल'मधील चार मुलांचा बाप अशा वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका त्याने उत्तमरित्या साकारल्या आहेत. तर आमिर हा सर्वाधिक मानधन घेणारा बॉलिवूड स्टार अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या आमिरकडे आलिशान बंगल्यासोबत अनेक महागड्या गाड्या आहेत. यामुळे आमिर खान नक्की किती कोंटीचा मालक आहे? हे जाणुन घेवूयात…
'कयामत से कयामत तक' (१९८८) या चित्रपटातून पहिल्यांदा त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातून आमिर रातोरात स्टार झाला होता. यापुढे त्याने 'दिल है कि मानता नहीं', 'जो जीता वही सिकंदर', 'अंदाज अपना अपना', 'रंगीला', 'राजा हिंदुस्तानी', 'गुलाम', 'सरफरोश', 'लगान', 'दिल चाहता है', 'रंग दे बसंती', 'फना', 'तारे जमीं पर', 'गजनी', '३ इडियट्स', 'धूम ३', 'पीके' आणि 'दंगल' यासारखे गाजलेल्या चित्रपटातून अभिनयाची छाप टाकली. अनेक हिट चित्रपटासह जाहिराती, स्टेज परफॉर्मन्समधून त्याने कोटी रूपयांची संपत्ती जमा केली आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आमिर खान ( aamir khan ) सध्या एकूण संपत्ती १ हजार ५६२ कोटी रूपयांचा मालक आहे. महिन्याला १० कोटींहून अधिक तर एका वर्षात १२० कोटींहून अधिक उत्पन्न कमवतो. आमिर चित्रपटांव्यतिरिक्त जाहिराती, निर्माते आणि स्टेज परफॉर्मन्समधून कमाई करतो. आमिर एका जाहिरातीसाठी १०-१२ कोटी रुपये तर एका चित्रपटात काम करण्यासाठी ५० कोटी रुपये घेत असल्याची माहिती मिळत आहे. आमिर हा देशातील सर्वाधिक कर भरणाऱ्यांपैकी एक आहे.
याशिवाय आमिरकडे मुंबईत एक आलिशान बंगला असून त्याची किंमत १८ कोटी इतकी आहे. हा बंगला त्याने २००९ मध्ये खरेदी केली आहे. याशिवाय त्यांच्याकडे इतरही अनेक मालमत्ता आहेत. आमिरकडे सध्या ९ आलिशान गाड्या असून त्याची किंमत १५ कोटींहून अधिक आहे. मर्सिडीज बेंझ, रॉल्स रॉस आणि फोर्ड सारख्या ब्रँडच्या गाड्याचा तो मालक आहे.
आमिरच्या वर्कफ्रंडबद्दल बोलायचे झाल्यास तो आगामी 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आमिरसोबत बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरही मुख्य भूमिकेत आहे. आमिर सोशल मीडियावर सक्रिय असून अपडेट चाहत्यांना देत असतो. आमिरचे ९२. ४ लाखांहून अधिक इंन्स्टाग्रामवर फॅन फोलोवर्स आहेत.
हेही वाचलंत का?