Latest

पुणे : पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांची गळफास घेऊन आत्महत्त्या

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे शहर पोलिस दलातील वरीष्ठ पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी त्यांच्या विश्रांतवाडी येथील शांतीनगर भागातील राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आला. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्त्या केली हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

सध्या त्या गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत होत्या. चव्हाण यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू होता. तसेच कामाच्या बाबतीत देखील त्यांचा दरारा होता. लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक गरजू लोकांना मदतीचा हात देण्याबरोबरच 'इ पास'ची जबाबदारी त्यांनीसमर्थपणे पेलली. भरोसा सेलमध्ये देखील त्यांनी अनेक दिवस यशस्वीपणे कामगिरी पार पाडली.

घटनेची माहिती मिळताच वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. त्यांच्या अचानक जाण्याने पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT