Latest

RRR Movie : भारतासाठी मोठी अभिमानाची गोष्ट: पीएम मोदी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : एसएस राजामौलीचा चित्रपट RRR ने गोल्डन ग्लोब ॲवॉर्ड्सवर मोहोर उमटवली आहे. अमेरिकेत हा सोहळा पार पडतोय. RRR चे गाणे नाटू-नाटू हे बेस्ट ओरिजिनल सॉन्ग ठरले आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी RRR Movie च्या टीमचे अभिनंदन करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, भारतीय चित्रपटासाठी ऐतिहासिक क्षण आहे. भारतासाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे. त्याचसोबत अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आलिया भट्ट या सेलिब्रिटींनीदेखील सोशल मीडियावरून अभिनंदन केले आहे. (RRR Movie)

नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये लिहिलं- 'हा एक खूप ऐतिहासिक क्षण आहे. चित्रपटाचे संगीतकार एम एम कीरावाणी, एस एस राजामौली आणि आर आर आरच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. भारतासाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट आहेत.'

बिग बींनी RRR च्या टीमचे केले अभिनंदन

बिग बींनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिलं- RRR च्या टीमचे गोल्डन ग्लोब ॲवॉर्ड जिंकण्यासाठी खूप-खूप अभिनंदन. हे एक वेल डिझर्विंग ॲवॉर्ड होते.'

राम चरणने शेअर केला सेरेमनी फोटोज

आनंद व्यक्त करत राम चरणने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केलीय. ॲवॉर्ड मिळाल्यानंतर त्याने फोटोज शेअर करून त्यांनी लिहिलंय-आम्ही गोल्डन ग्लोब ॲवॉर्ड जिंकलो आहे.

ज्युनिअर एनटीआरने व्यक्त केला आनंद

ज्युनिअर एनटीआरने एम एम कीरावाणीला शुभेच्छा देत म्हटलंय-नाटू-नाटू नेहमीच माझ्यासाठी खूप स्पेशल गाणं ठरलं आहे. तुम्हाला यशाच्या खूप खूप शुभेच्छा. हे एक वेल डिजर्व्ह ॲवॉर्ड होता. मी माझ्या करिअरमध्ये अनेक गाण्यांवर डान्स केला आहे. पण नाटू-नाटू माझ्या हृदयाजवळ आहे.

शाहरुख खाननेही केले अभिनंदन

सोशल मीडियावर शाहरुखने ट्विट करत RRR च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या तसेच अभिनंदन केले. किंग खानने ट्विटमध्ये लिहिलं- 'सर सकाळी डोळे उघडताच मी नाटू-नाटू गाण्यावर डान्स करत गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाल्याबद्दल सेलिब्रेट केलं. अद्याप आणखी काही ॲवॉर्ड्स येणं बाकी आहे'

शाहरुखच्या या ट्विटला रि-ट्विट करत एस एस राजामौली यांनी लिहिलं- ट्रेलर दमदार वाटत आहे. किंग खान पुन्हा एकदा परत आलाय. पठानच्या संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट.'

सुपरस्टार चिरंजीवीने केले म्युझिक कंपोजरचे अभिनंदन

साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांनी नाटू-नाटूचे म्युझिक कंपोजर एम एम कीरावाणी यांचे अभिनंदन करत लिहिले-व्वा काय अभूतपूर्व, ऐतिहासिक क्षण आहे. गोल्डन ग्लोब्स बेस्ट ओरिजिनल सॉन्गसाठीचा ॲवॉर्ड जिंकण्यासाठी खूप खूप अभिनंदन. याचे श्रेय एम एम कीरावाणीला जाते. एस एस राजामौली आणि RRR च्या संपूर्ण टीमचे या यशासाठी खूप खूप अभिनंदन. भारताला अभिमान आहे.'

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टचीदेखील RRR चित्रपटात भूमिका आहे. विनिंग मोमेंटचा व्हिडिओ शेअर करत आलियाने आनंद व्यक्त केला.

ए आर रहमानने RRR च्या टीमला दिल्या शुभेच्छा

ए आर रहमान यांनी ट्विटमध्ये लिहिलंय -भारतीय आणि आपल्या फॅन्सकडून एम एम कीरावाणी आणि RRR च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा आणि अभिनंदन.'

SCROLL FOR NEXT