Latest

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांचे होणार भूमीपूजन

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकाच वेळी 508 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पांचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. हा सर्व लाइव टेलीकास्‍ट प्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब म्‍हणजे 44 स्थानकांचा यामध्ये समावेश आहे. आज 44 स्थानकांच्या प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे.

अमृत भारत स्थानक योजना ही पंतप्रधान मोदी यांच्या दृष्टीकोनावर आधारित असलेली योजना सुरू केली आहे. या योजनेत पंतप्रधान मोदी यांच्या हस्‍ते 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांची होणार आहे. 24,470 कोटी खर्च करून हा पुनर्विकास केला जाणार आहे.
पुनर्विकास प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्थानकांचा समावेश

अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश

अमृत भारत स्थानक योजनेअर्तंगत महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश आहे. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री अश्विन वैष्‍णव, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जरदोश तसेच केंद्रीय मंत्री, खासदार, राज्याचे मंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT