Covid-19 New Varient ERIS : कोरोनाचा पुन्हा एक नवा व्हेरिअंट; ‘एरिस’ आजाराचा यूकेमध्ये प्रसार | पुढारी

Covid-19 New Varient ERIS : कोरोनाचा पुन्हा एक नवा व्हेरिअंट; 'एरिस' आजाराचा यूकेमध्ये प्रसार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ३ वर्षांपूर्वी थैमान घातलेला कोविड-१९ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या आजारशी संबंधित एक नवीन प्रकार सध्या आलेला आहे. EG.5.1 असे या नव्या आजाराचे नाव आहे. हा आजार वेगाने पसरत आहे. Omicron या आजारानंतर हे नाव आता चर्चेत आलेलं आहे. (Covid-19 New Varient ERIS)

यूकेमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी या आजाराबाबतची माहिती दिली आहे. EG.5.1 याच Eris असं नाव आहे. गेल्या महिन्यात यूकेमध्ये प्रथम या आजाराविषयी माहिती देण्यात आली. स्काय न्यूजच्या अहवालानुसार, युकेमध्ये हा आजार झपाट्याने पसरत आहे, अशी बातमी इंग्लंडमधील आरोग्य अधिकाऱ्यांच्या हवाल्यानुसार पीटीआयने ही माहिती दिली आहे. (Covid-19 New Varient ERIS)

यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (UKHSA) ने सांगितले की, EG.5.1, ज्याला एरिस टोपणनाव देण्यात आले आहे, सात नवीन COVID आजारापैकी एक आहे, असे अहवालात म्हटले आहे. नवीन माहिती सूचित करते की आता 14.6% प्रकरणे या आजाराशी संबंधित आहेत.

Back to top button