Latest

२०३०पर्यंत भारताची स्टील निर्मिती क्षमात तिप्पटीने वाढणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन : देशांतर्गत स्टील उत्पादन क्षमता वार्षिक २०३०पर्यंत ३०० दशलक्ष टन इतकी वाढणार आहे, याचा फार मोठा फायदा देशाच्या विकासात होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गुजरातमधील हजिरा येथे ArcelorMittal – Nippon Steel यांच्या प्रॉडक्शन प्लॅंटच्या विस्तारिकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले, "जर स्टील उद्योगाचा विस्तार झाला तर देशातील पायाभूत सुविधांचाही विकास होतो. या प्रकल्पात ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत आहे. त्यामुळे गुजरात आणि देशाच्या इतर भागातही रोजगार निर्मिती होईल. गेल्या ८ वर्षांत भारत हा स्टील निर्मितीत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आत्मनिर्भर भारत यशस्वी करण्यात स्टील उद्योग मोठी भूमिका पार पाडणार आहे." (ArcelorMittal – Nippon Steel Expansion)

ArcelorMittal आणि Nippon Steel या जगातील स्टील निर्मितीमधील दोन बलाढ्य कंपन्या आहेत. या दोन कंपन्यांनी जाईंट व्हेंचर स्थापन केली आहे. त्यांच्या हाजिरा येथील प्लांटची सध्याची क्षमता वार्षिक ९ दशलक्ष टन आहे. ती १५ दशलक्ष टन विस्तारित केली जाणार आहे. या विस्तारासाठी ६० हजार कोटींची गुंतवणूक केली जात आहे. यामुळे फक्त गुजरातच नाही तर देशभरात रोजगार निर्मितीसाठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे स्टील निर्मितीत जागतिक पातळीवरील केंद्र म्हणून देशाचा लौकीक वाढणार आहे. (ArcelorMittal – Nippon Steel Expansion)

हेही वाचा

SCROLL FOR NEXT