Latest

लता मंगेशकर पुरस्‍कार देशवासियांना समर्पित : पंतप्रधान नरेंद्र मोदी

अमृता चौगुले

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

संगीत विषयाचे मला ज्ञान नाही; परंतु संगीत एक स्‍वर आपल्‍या रडवू शकते इतकी शक्‍ती संगीतामध्ये आहे. आपण भाग्‍यवान आहोत की, आपल्‍याला लतादिदींना पाहता आणि त्‍यांचे स्‍वर ऐकता आले. लतादिदी माझासाठी मोठी बहिण हाेत्‍या. त्‍यांच्‍या नावाने पुरस्‍कार मिळणे हे मी माझे भाग्‍य समजताे. मोठया बहिणीचा पुरस्‍कार मला मिळाला यांचा खूप आनंद आहे. हा पुरस्‍कार मी देशवासियांना समर्पित करताे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले.

आज (दि. २४) मुंबईमध्ये षण्मुखानंद हॉलमध्ये लता दिनानाथ मंगेशकर पुरस्‍कार प्रदान साेहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान माेदी म्‍हणाले, "चार दशकांपूर्वी सुधीर फडके यांच्यामूळे लतादीदींबराेबर ओळख झाली. लतादीदी सरस्‍वतीचे रूप म्‍हणजे हाेत्‍या. तब्‍बल पाच पिढ्यांना त्‍यांच्‍या स्‍वराने मंत्रमुग्‍ध झाले.

लतादीदींनी ३० पेक्षा जास्‍त भाषेत गाणी गायली. देशातील सर्व भाषांमधील गीतांना त्‍यांनी स्‍वर दिला. लतादीदींच्या गाण्यामध्ये देशभक्‍ती दिसून येते. नव्या पिढीसाठी लतादीदींचे सूर प्रेरणादायी आहेत. मी मंगेशकर परिवारांचे आभार मानतो. असेही मोदी म्‍हणाले.

हेही वाचा  : 

.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT