Latest

PM MODI Invited by Ukraine : पंतप्रधान मोदींना झेलेन्स्कीकडून युक्रेन भेटीचे निमंत्रण

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्लादिमीर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युक्रेन भेटीचे निमंत्रण दिले आहे. याबाबतची माहिती परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. जपानमधील हिरोशिमा येथील G-7 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान उभय नेत्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. (PM MODI Invited by Ukraine)

मोदी आणि झेलेन्स्की यांच्यामधील ही चर्चा अर्धा तास सुरु होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया-यूक्रेन युद्धाविषयी भारताच्या दृष्टीकोनातून चर्चा केली. पीएम मोदी यांनी संयुक्त राष्ट्र चार्टर आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे महत्व अधोरेखित केले असल्याची माहिती विनय क्वात्रा यांनी दिली आहे. (PM MODI Invited by Ukraine)

G7 परिषदेसाठी पंतप्रधान शुक्रवारी भारतातून रवाना झाले. जपान येथे पोहोचल्यानंतर त्यांनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये भारत-जपान व्यापार, आर्थिक, सांस्कृतिक संबंधांवर चर्चा झाली. आज पंतप्रधान यांनी हिरोशिमा येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी त्यांनी महात्मा गांधींचे आदर्श हे जगाला हवामान बदलाच्या संकटाशी लढण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे, असे मत व्यक्त केले. तसेच जपानमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जपान सरकारला धन्यवाद दिले.

यावेळी G7 परिषद सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे चँसलर ओलाफ स्कॉल्झ, व्हिएतनामचे समकक्ष फाम मिन्ह चिन्ह यांची भेट घेतली. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील हिरोशिमा येथे कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी "भारत-कोरिया प्रजासत्ताक या वर्षी राजनैतिक संबंधांची 50 वर्षे साजरी करत असताना द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी नेत्यांनी वचनबद्धतेची पुष्टी केली. व्यापार आणि गुंतवणूक, उच्च तंत्रज्ञान, आयटी हार्डवेअर उत्पादन, संरक्षण, सेमीकंडक्टर आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यावर नेत्यांनी सहमती दर्शवली. तसेच भारताचे G20 अध्यक्षपद आणि कोरिया रिपब्लिक ऑफ कोरियाच्या इंडो-पॅसिफिक रणनीतीवर चर्चा केली," असे ट्विट MEA प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट केले.

मोदी-बायडेन यांची गळाभेट

G7 परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन सहभागी झालेत. यावेळी परिषद स्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची देखील गळाभेट घेतली. याचा व्हिडिओ एएनआयने पोस्ट केला आहे.

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT