Latest

Pariksha Pe Charcha 2024 | पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना रिल्स पाहण्याचे सांगितले तोटे

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही एकामागून एक रिल्स पहात राहिल्यास वेळ वाया जाईल, झोपेचा त्रास होईल आणि तुम्ही काय वाचले आहे ते आठवणार नाही. झोपेला कमी लेखू नका. आधुनिक आरोग्य विज्ञान झोपेला खूप महत्त्व देते. तुम्हाला आवश्यक ती झोप मिळते की नाही याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो, असे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा' (Pariksha Pe Charcha 2024) संवादावेळी विद्यार्थ्यांना म्हटले.

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहेत. या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी आज देशभरातील दहावी आणि बारावी विद्यार्थ्यासोबत 'परीक्षा पे चर्चा' (Pariksha Pe Charcha 2024) कार्यक्रम आयोजित केला होता. दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बोर्ड परीक्षेपूर्वी तणाव आणि भीती कमी करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलवर रिल्स पाहण्याचे तोटे देखील सांगितले.

संबंधित बातम्या : 

ज्या वयात आवश्यक त्या गोष्टी आहारात आहेत की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या आहारातील समतोल आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे, फिटनेससाठी व्यायाम केला पाहिजे, रोज टूथब्रश करता त्याप्रमाणे व्यायामात कोणतीही तडजोड न करता सातत्य ठेवा, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

विद्यार्थ्याच्या 'त्या' प्रश्नावर मोदी का हसले?

तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी मोबाईल फोन वापरत असतील आणि काही लोकांना तासन्तास ते वापरण्याची सवय असेल, पण तुम्ही कधी विचार केला आहे की मी फोन चार्ज केला नाही तर त्याचा वापर कमी होईल. काम करण्यासाठी मोबाईल चार्ज करावा लागत असेल तर बॉडीही चार्ज करावी. ज्याप्रमाणे मोबाईल फोनला चार्जिंगची गरज असते, त्याचप्रमाणे शरीरालाही चार्जिंगची गरज असते. त्याशिवाय जीवन जगता येत नाही, म्हणून जीवनाचा थोडासा समतोल साधावा लागतो. जर आपण निरोगी नसलो तर आपण तीन तास परीक्षेला बसू शकणार नाही. निरोगी मनासाठी निरोगी शरीर आवश्यक आहे. याचा अर्थ असा नाही की कुस्ती खेळावी लागेल. एक पुस्तक घ्या आणि सूर्यप्रकाशात वाचा कारण शरीर रिचार्ज करण्यासाठी सूर्यप्रकाशाची देखील आवश्यकता असते, असेही मोदी यांनी विद्यार्थांना सांगितले. (Pariksha Pe Charcha 2024)

तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिकणे गरजेचे

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक ही वाईट गोष्ट आहे असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. माझ्या हातात मोबाईल फोन फार क्वचितच असतो, मला माहित आहे की तो माझ्यासाठी एक आवश्यक स्त्रोत देखील आहे. स्वतः दिवसभर मोबाईलवर असणा-या पालकांनाही आपल्या मुलाने यापासून दूर राहावे असे वाटते. कुटुंबात चांगले वातावरण असणे महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानाला ओझे समजू नये, त्याचा योग्य वापर शिकणे गरजेचे आहे. मोबाईलवर काय होते ते तुम्ही तुमच्या पालकांना सांगावे. नाहीतर मोबाईल म्हणजे मित्रमैत्रिणींसोबत अडकून पडणे असे पालकांना वाटेल. स्क्रिन टाइमर चालू ठेवा, जेणेकरुन तुम्हाला कळेल की तुम्ही मोबाईल जास्त वापरत आहात की नाही. (Pariksha Pe Charcha 2024)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT