Latest

PM MODI : मी ओबीसी असल्यामुळे काँग्रेसकडून अपशब्दांचा वापर; पीएम मोदींकडून प्रचारसभेत आरोप

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : मी ओबीसी (इतर मागास वर्गातील) असल्यामुळे काँग्रेस पक्षाने माझ्याविरोधात अपशब्दांचा वापर केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. पीएम मोदी यांनी गुरुवारी (दि.२) गोंविदपुरमध्ये विजयी संकल्प रॅलीला संबोधित केले. या वेळी बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. (PM MODI)

छत्तीसगढमध्ये ओबीसींची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे जातवार जनगणनेचा मुद्दा उपस्थित करुन काँग्रेस ओबीसींना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पीएम मोदीही ओबीसींचा मुद्दा उपस्थित करत आहेत, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. कांकेर येथील निवडणूक सभेत पीएम मोदींनी स्वत: ओबीसी असल्याचे सांगितले. शिवाय आदिवासींच्या हिताची चर्चा करुन दोन्ही वर्गाचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. (PM MODI)

छत्तीसगडला देशातील आघाडीचे राज्य बनवणार – पीए मोदी (PM MODI)

मोदी म्हणाले, आज बस्तरच्या या पवित्र भूमीतून मलाही भाजपच्या संकल्पात सामील होण्याची संधी मिळाली आहे. छत्तीसगढची ओळख मजबूत करण्याचा भाजपचा संकल्प आहे. प्रत्येक गरीब, आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या हिताचे रक्षण करणे हा आमचा उद्देश आहे. छत्तीसगडला देशातील आघाडीच्या राज्यांमध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. (PM MODI)

छत्तीसगडच्या जनतेला काँग्रेसने खराब रस्ते दिले आहेत. काँग्रेसने तुम्हाला जीर्ण शाळा आणि रुग्णालये दिली आहेत. सरकारी कार्यालयात लाचखोरीचा नवा विक्रम केला आहे. काँग्रेसच्या राजवटीत तुम्हाला खून, गुन्हेगारी, हिंसाचार असे सगळे मिळाले, असा आरोपही पीएम मोदींनी केला. (PM MODI)

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT