Latest

Pink WhatsApp Scam : सावधान! पिंक व्हॉट्स अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी हे जरुर वाचा  

सोनाली जाधव
पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्याला सायबर स्कॅमच्या अनेक घटना कानावर येत असतात. काहीवेळा आपणही अशा काही स्कॅमला बळीही पडू शकतो पण योग्य ती खबरदारी घेतली तर आपणही या स्कॅम पासून वाचू शकतो. अलिकडच्या काही दिवसात पिंक व्हॉट्स अ‍ॅप स्कॅमने धुमाकूळ घातला आहे. काही आमिषे दाखवत पिंक व्हॉट्सअ‍ॅप डाऊनलोड करण्याचा संदेश वेगाने व्हायरल होत आहे. यावर क्लिक करताच अनेकांचे संपर्क क्रमांक आणि जतन केलेल्या फोटोंचा अनधिकृत वापर केला गेला आहे, आर्थिक नुकसान झाले आहे. याच पिंक व्हाटसअ‍ॅप बद्दल आपण आज जाणून घेऊया. (Pink WhatsApp scam)

Pink WhatsApp scam : सावधान! पिंक व्हॉट्स अ‍ॅप फिशिंग वाढत आहेत

मेटाच्या मालकीचे व्हॉट्स अ‍ॅप नेहमीच आर्थिक घोटाळे, फेक न्यूजसाठी चर्चेत राहिले आहे. अनेक सोशल मीडिया युजर्स व्हॉट्सअ‍ॅप संवादासाठी प्राधान्य देत असतात. मिलियनमध्ये युजर्स व्हॉट्सअ‍ॅपवर सक्रिय आहेत. याच लोकप्रियतेमुळे हॅकर्सना युजर्सपर्यंत जाणे सोपे जाते. अलिकडच्या काही दिवसात पिंक व्हॉट्सअ‍ॅप फिशिंगचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. व्हॉट्स अॅपवर एक नवीन संदेश व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये लोकांना 'पिंक व्हॉट्स अ‍ॅप' डाउनलोड करण्याची लिंक येत आहे.
घोटाळेबाज अनेक लोकांना ही लिंक पाठवत आहेत आणि नवीन खास अशी वैशिष्ट्ये असलेल्या व्हॉट्स अ‍ॅपचे नवीन रूप मिळविण्यासाठी त्यांना अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगत आहेत. मुंबई पोलिसांनी याबाबत इशारा दिला आहे. त्यांनी त्याला व्हायरस म्हटले आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार, अधिकाऱ्यांनी प्लॅटफॉर्मशी जोडलेल्या या नवीन फसवणुकीबद्दल लोकांना सल्ला दिला आहे की,  त्यांनी लिंकवर क्लिक करू नये किंवा अ‍ॅप डाउनलोड करू नका, असे आवाहन केले आहे. पोलिसांनी पुढे असेही सांगितले आहे की, या लिंकवर क्लिक केल्यास वापरकर्त्याच्या फोनवर फिशिंग हल्ला होतो, ज्याद्वारे संवेदनशील माहिती चोरली जाते किंवा स्कॅमरला वापरकर्त्याच्या डिव्हाइसचे नियंत्रण  मिळते.

लिंकवर क्लिक केल्यास काय होईल?

  • संपर्क क्रमांक आणि जतन केलेल्या फोटोंचा अनधिकृत वापर
  • आर्थिक नुकसान
  • क्रेडेन्शियल्सचा चुकीचा वापर
  • स्पॅम हल्ला
  • मोबाइल उपकरणांचे नियंत्रण हॅकरकडे जाऊ शकते.

Pink WhatsApp scam : सुरक्षित कसे रहावे

  • सर्वप्रथम, जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एखादे बनावट अॅप डाऊनलोड केले असेल, तर ते त्वरित अनइन्स्टॉल करा.
  • कोणतेही अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी  सावधगिरी बाळगा
  • अज्ञात स्त्रोतांकडून प्राप्त झालेल्या लिंकवर क्लिक करणे टाळा जोपर्यंत तुम्ही त्यांची सत्यता पडताळत नाही.
  • फक्त अधिकृत Google Play Store किंवा iOS App Store किंवा कायदेशीर वेबसाइटवरून अॅप्स इंस्टॉल किंवा अपडेट करा
  • योग्य पडताळणीशिवाय कोणतीही लिंक किंवा संदेश इतरांना फॉरवर्ड करू नका.
  • तुमचे वैयक्तिक तपशील किंवा आर्थिक माहिती जसे की लॉगिन क्रेडेंशियल, पासवर्ड, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड तपशील आणि तत्सम माहिती ऑनलाइन कोणाशीही शेअर करणे टाळा.

व्हॉट्स अ‍ॅपने या व्हॉट्स अ‍ॅप पिंक बाबतीत कोणत्याही स्वरुपाचे अधिकृतरित्या समर्थन केलेले नाही.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT