Latest

Petrol Diesel Prices : १० दिवसांत नवव्यांदा इंधन दरात वाढ, मुंबईत डिझेलचे शतक

backup backup

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढ सुरूच आहे. मागच्या १० दिवसांत नवव्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. आज गुरूवारी तेल कंपन्यांनी पुन्हा पेट्रोल व डिझेल दरात वाढ केली. यामुळे मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ११६ रुपये ७२ पैसे तर डिझेल १०० रुपये ९४ पैशांवर पोहोचले आहेत. मागच्या दहा दिवसांपासून इंधन दरात ६.४० रुपये वाढ झाली आहे. (Petrol Diesel Prices)

देशाची राजधानी दिल्लीमध्ये आता पेट्रोलने शंभरी पार केली आहे. त्या ठिकाणी आता १०१.८१ रुपये प्रति लिटर दर झाला आहे, तर डिझेलचा दर ९३.०७ रुपयांवर पोहोचला आहे.

पेट्रोल आणि डिझेलची देशव्यापी दरवाढ होत असून राज्यांमधील कर रचनेवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये तफावत आहे. स्थानिक करांसह पेट्रोल आणि डिझेलची किंमत निश्चित होते. गेल्या साडे चार महिन्यात तब्बल ९ वेळा इंधन दरवाढ झाली आहे. घरगुती गॅसच्या किंमतीमध्येही ५० रुपयांची दरवाढ यापूर्वीच झाली आहे. (Petrol Diesel Prices)

SCROLL FOR NEXT