Latest

Petrol and diesel : सलग दुसर्‍या दिवशी इंधन दर स्थिर

नंदू लटके

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर काही प्रमाणात नरम झाल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ अथवा कपात केली नाही. ( Petrol and diesel prices )

( Petrol and diesel  ) क्रूड तेलाचे प्रति बॅरलचे भाव स्थिर

क्रूड तेलाचे प्रति बॅरलचे भाव सध्या 84 डॉलर्सच्या आसपास स्थिर आहेत. ( Petrol and diesel) क्रूड तेलाच्‍या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी अलिकडील काळात इंधन दरात मोठी वाढ केलेली आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सध्या पेट्रोलचे प्रति लिटरचे दर 111.77 रुपयांवर असून डिझेलचे दर 102.52 रुपयांवर आहेत. दुसरीकडे दिल्लीमध्ये हेच दर क्रमशः 105.84 आणि 94.57 रुपयांवर आहेत. कोलकाता येथे पेट्रोलचे दर 106.43 रुपयांवर तर डिझेलचे दर 97.68 रुपयांवर आहेत. तामिळनाडूतील चेन्नई येथे हेच दर क्रमशः 103.01 आणि 98.92 रुपयांवर आहेत.

हेही वाचलं का?

SCROLL FOR NEXT