Latest

Adani-Hindenburg Row : हिंडेनबर्ग विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; नॅथन अँडरसनवर कारवाईची मागणी

अविनाश सुतार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा; देशाच्या शेअर बाजारात हिंडेनबर्गच्या अहवालामुळे भुकंप आला आहे. अशात या कंपनीचे मालक आणि संस्थापक नॅथन अँडरसन विरोधात कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. वकील मनोहर लाल शर्मा यांनी ही याचिका दाखल केली आहे. शॉर्ट सेलर अँडरसन तसेच त्याच्या सहकार्यांनी लाखो निष्पाप गुंतवणुकारांचे शोषण तसेच फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाने (सेबी) चौकशी करावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. Adani-Hindenburg Row

हिंडेनबर्ग रिससर्चने २० हजार कोटींच्या फॉलो-ऑन पब्लिक ऑफरच्या (एफपीओ) अगोदर अदाणी समुहाविरोधात हेतुपुरस्सर हा अहवाल प्रसिद्ध केल्याचा दावाही याचिकेतून करण्यात आला आहे. गुंतवणुकदारांचे नुकसान झाल्याप्रकरणी सेबीने चौकशी करीत हिंडेनबर्गवर दंडात्मक कारवाई करावी तसेच गेल्या सहा सत्रामध्ये गुंतवणुकदारांचे शेअर बाजारात मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांना हिंडनबर्गने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ही याचिकेतून करण्यात आली आहे.

अदानी समुहावरील अहवाल हिंडनबर्ग फर्मने सादर केल्यानंतर देशात वादंग निर्माण झाला आहे. समुहाचे शेअर सातत्याने घसरत आहेत. शुक्रवारी देखील कंपनीच्या शेअरची पडझड सुरूच होती. गेल्या ९ दिवसांमध्ये समुहाचे शेअर ७० टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. हिंडनबर्गने अदानी समुहावर बाजारात अपहार तसेच खात्यांमध्ये फसवणुकीचा आरोप केला होता. Adani-Hindenburg Row

हे ही वाचा 

SCROLL FOR NEXT