Latest

नव वर्ष… नवे संकल्‍प : गुजरातने केला ‘सूर्यनमस्‍कार’चा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गुजरातने आज सर्वाधिक लोकांनी एकत्र सूर्यनमस्कार ( Surya Namaskar) करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. गुजरातच्या लोकांनी 2023 मध्ये अशाच प्रकारचा विक्रम केला होता. आज गुजरातने पुन्हा एकदा जागतिक विक्रम केला आहे. हा कार्यक्रम 108 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. राज्‍यातील लाखो लोकांनी एकत्र सूर्यनमस्कार घातले, अशी माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली.

सामूहिक सूर्यनमस्‍कार उपक्रमाबाबत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे  ॲडज्युडिकेटर स्वप्नील डांगरीकर यांनी सांगितले की, "सर्वाधिक सूर्यनमस्कार करणाऱ्या व्यक्तींच्या विक्रमाची पडताळणी करण्‍यात आली. आज गुजरातमध्‍ये एकाचवेळी लाखो नागरिकांनी सूर्यनमस्‍कार घालण्‍याचा नवा विक्रम ठरला आहे. हा उपक्रम राबवत गुजरातने आपल्‍याच नावावर असणारा विक्रम मोडत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे नाव कोरले आहे.

गुजरातमधील पाटणच्या दक्षिणेस ३० किलोमीटर अंतरावर मोढेरा गावात सूर्य मंदिर आहे. हे मंदिर अद्वितीय स्थापत्य आणि कारागिरीचे अतुलनीय उदाहरण आहे. नववर्षाच्या पहिल्या पहाटेच्या निमित्ताने या मंदिरात सूर्यनमस्काराचा कार्यक्रम झाला, ज्यामध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष संघवी सहभागी झाले होते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नवीन वर्षाचा सूर्योदय होताच या राज्यातील लोकांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला.

सोमवारी सकाळी मोढेरा सूर्य मंदिरात सूर्यनमस्काराचा कार्यक्रम झाला. यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे निरीक्षक स्वप्नील डांगरीकरही येथे पोहोचले. सूर्यनमस्कार करणाऱ्या सर्वाधिक लोकांच्या रेकॉर्डची पडताळणी करण्यासाठी मी येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व पुरावे तपासल्यानंतर गुजरातमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी एकत्रितपणे सूर्यनमस्कार केल्याने एक नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT