Latest

Pathan Box Office : ‘पठाण’ची कमाल, देशातील कमाई ५०० कोटींच्या उंबरठ्यावर

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क :  अभिनेता शाहरुख खानची जादू बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा दिसत आहे. सध्या त्याचा पठाण हा चित्रपट मोठी कमाई करत आहे. तिसऱ्या आठवड्यातही पठाणने मोठी कमाई केली आहे. शाहरुख आणि दीपिकाची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट लवकरच ५०० कोटींचा आकडा पार करेल, असे बोलले जात आहे. बाहुबली : द कनक्लुजन या चित्रपटानंतर ५०० कोटींची कमाई करणारा पठाण हा दुसरा चित्रपट ठरणार आहे. शनिवारपर्यंत पठाण  चित्रपटाने अन्‍य भाषांमध्‍ये एकूण ४७६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. केवळ हिंदी भाषेत या चित्रपटाने  ४५० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. (Pathan Box Office)

तिसऱ्या शनिवारपर्यंत ११ कोटींची कमाई

हिंदी भाषेतील पठाण या चित्रपटाने तिसऱ्या शनिवारपर्यंत ११ कोटींचा आकडा पार केला होता. यापूर्वी शुक्रवारी पठाण चित्रपटाने ५.७५ कोटींची कमाई केली होती. शनिवारी शाहरुखच्या चित्रपटाने राष्ट्रीय पातळीवर ४.८५ कोटींचा आकडा पार केला आहे. शुक्रवारी ३.५८ कोटींची कमाई केली होती. याशिवाय पठाण हा चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. (Pathan Box Office) दक्षिण भारतातील भाषांचा विचार केल्यास तेलगू आणि तमिळ भाषेत पठानने शुक्रवारी १५ लाखांचा गल्ला जमवला होता. शाहरुख आणि दीपिकाच्या पठाणने एकूण ४७६ कोटींची कमाई केली आहे.

पुढील आठवडाही 'पठाण'साठी महत्त्‍वपूर्ण (Pathan Box Office)

पठाण या चित्रपटासाठी पुढील आठवडा महत्वपूर्ण असणार आहे. चित्रपटाने या आठवड्यात २४ कोटींची कमाई केली. त्यामुळे आता तिसरा रविवारही महत्वपूर्ण असणार आहे. पठाणने रविवारी मोठी कमाई केल्यास ५०० कोटींचा आकडा पार करणे सोपे होणार आहे. यापूर्वी केजीएफ २ आणि बाहुबली २ या चित्रपटांनी ५०० कोटींचा आकडा पार केला होता. (Pathan Box Office) पठाणने या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुखने पुनरागमन केले आहे. याशिवाय त्याचे जवान आणि डंकी हे चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT