Latest

Parliament Session : मुख्य निवडणुक आयुक्तांविषयीचे विधेयक लोकसभेत मंजूर

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्य निवडणुक आयुक्तांची नियुक्ती आणि त्यांच्या सेवाशर्तींविषयीचे विधेयक आज लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. ही विधेयक यापूर्वी राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. आता अंतिम मंजूरीसाठी हे विधेयक राष्ट्रपतींकडे जाणार आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल.

आज राज्यसभेत मांडली जाणार ३ फौजदारी विधेयके (Parliament Session)

आज (दि.२१) राज्यसभेत तीन नवीन फौजदारी विधेयके मांडली जाणार आहेत. लोकसभेत बुधवारी तीन नवीन विधेयके मंजूर करण्यात आली. दरम्यान, संसद सुरक्षेच्या मुद्यावरुन विरोधकांनी सरकारला घेरले असताना ही विधेयक महत्वाची मानली जात आहेत. विरोधक सातत्याने संसदेत झालेल्या घुसखोरीबाबत जाब विचारताना दिसत आहेत. (Parliament Session)

 तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जींविरोधात भाजपचं आंदोलन (Parliament Session)

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची खिल्ली उडवल्याच्या निषेधार्थ भाजपने आंदोलन केले. आज दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे आंदोलन करण्यात आले. भाजप नेत्या बांसुरी स्वराज याबाबत म्हणाल्या, 'विरोधकांनी लोकशाहीचा अपमान केला आहे. (Parliament Session)

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT