Latest

Parle-G: ‘पार्ले-जी’ पॅकेटवरून ‘पार्ले गर्ल’ गायब! काय आहे नेमकं प्रकरण?

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: 'पार्ले'ने कंपनीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर 'पार्ले-जी बिस्किट' पॅकेटच्या रॅपरवर 'पार्ले गर्ल'ऐवजी इंस्टाग्राम इन्फ्लुएंसरच्या फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये 'पार्ले-जी'चे नावही बदलण्यात आले आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. (Parle-G)

जेव्हा जेव्हा बिस्किटाची चर्चा होते, तेव्हा लहानांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत पहिले नाव 'पार्ले जी'चे येते. यासोबतच बिस्किटच्या पॅकेटवर छापलेले पार्ले गर्लचे चित्रही समोर येते; पण आता पॅकेटवरून पार्ले गर्लचे चित्र गायब झाले आहे. कंपनीने या संदर्भातील फोटो अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोवर 'पार्ले गर्ल' नाही तर एका फेमस इंस्टाग्राम इन्फ्लुएंसरच्या फोटो दिसत आहे. एवढेच नाही तर पार्ले जी च्या नावातही बदल केला आहे. त्यामुले नेटीझन्स हे कंन्फ्युज झाले आहेत. त्यामुळे सर्व काय आहे ते समजून घेऊया? (Parle-G)

Parle-G: केवळ जाहिरातीसाठी पार्लेची अनोखी रणनीती

एका प्रसिद्ध इन्फ्लुएंसर निर्माता जेरवान जे बुनशाह यांनी (Zervaan J Bunshah's) एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याने आपल्या फॉलोअर्संना विचारले की, जर तुम्ही पार्लेच्या मालकाला भेटले तर तुम्ही त्याला काय म्हणाल, 'पार्ले सर, मिस्टर पार्ले की पार्ले जी? व्हिडिओतील बुनशानच्या चेहऱ्यावरील हावभाव गोंधळात टाकणारे होते. अनिल कपूरच्या राम लखन चित्रपटातील 'आई जी ओ जी' हा ट्रॅक बॅकग्राउंडमध्ये वाजत होता. त्यामुळे ही केवळ जाहिरातीसाठी वापरण्यात आलेली रणनिती असल्याचे समजते. (Parle G)

तुम्ही आम्हाला 'ओजी' म्हणू शकता :  कंपनीचा प्रतिसाद

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओने केवळ इंस्टा युजर्संना आकर्षित केले नाही तर पार्ले कंपनीचेही लक्ष वेधून घेतले; मग काय, कंपनीनेही या मनोरंजक व्हिडिओला प्रतिसाद म्हणून एक पोस्ट केली आहे. जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. पार्ले-जी ने आपल्या अधिकृत खात्यात टिप्पणी केली की, बुनशाहजी तुम्ही आम्हाला 'ओजी' देखील म्हणू शकता. यासोबतच पार्ले-जीने बिस्किट पॅकेटच्या रॅपरवर पार्ले गर्लच्या ऐवजी प्रसिद्ध इन्फ्लुएंसर बुनशाह यांचा हसतमुख फोटो पोस्ट केला आहे.

'पार्ले-जी'चा दबदबा कायम

देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सुरू झालेल्या पार्ले-जी बिस्किटाच्या चाहत्यांची कमतरता नाही. त्यामुळेच एका छोट्याशा कारखान्यात कँडीपासून सुरू झालेली पार्ले ही कंपनी आज 17000 कोटी रुपयांहून अधिक किमतीची कंपनी बनली आहे. या क्षेत्रात अनेक ब्रँड बाजारात आले आणि गेले पण पार्ले-जीचा दबदबा कायम आहे. २०११ मध्ये, निल्सनच्या सर्वेक्षणानुसार, पार्ले-जी हा जगातील सर्वाधिक विकला जाणारा बिस्किट ब्रँड म्हणून उदयास आला होता. त्याच्या पॅकेटवर एका गोंडस मुलीचे चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेते आणि ती या बिस्किट ब्रँडची ओळख बनली. पण पार्ले कंपनीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बिस्किटाच्या पाकिटाची एक नवीन छायाचित्र शेअर केले आहे. जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, पार्ले गर्लची जागा दुसऱ्या कोणी घेतली आहे की काय? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT